हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। वेगवेगळ्या आशयाच्या आणि विषयाच्या कथानकांमधून सामाजिक प्रबोधन करणाऱ्या फार कमी कलाकृती प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसतात. यांपैकी जेणेक कलाकृतींना प्रेक्षकांचा हवा तास प्रतिसाद मिळत नाही. पण न बोलल्या जाणाऱ्या विषयांवर खुलेपणाने भाष्य करणाऱ्या या कृतींचा प्रेक्षक वर्ग फार वेगळा असतो. अशाच वेगळ्या प्रेक्षकांसाठी एक नवी वेबसिरीज येते आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ‘सेक्स्टॅार्शन’ या विषयावर भाष्य करणारी ‘कांड’ ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीस येण्यासाठी सज्ज झाली आहे.
‘कांड’ या वेबसीरीजचे पहिले पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले असून सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. हे पोस्टर पाहून कथानकाविषयी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ‘सेक्स्टॅार्शन’ म्हणजे काय..? तर लैंगिक खंडणी. समाजात या खंडणीचा प्रकार विविध स्तरातील लोकांच्या माध्यमातून वाढीस लागताना दिसतोय. प्रत्यक्ष म्हणा किंवा अप्रत्यक्ष, फोनवर म्हणा किंवा जाहिरातीच्या माध्यमातून हे मायाजाल विस्तारत चाललं आहे. समाजातील याच भयाण वास्तवावर ही वेब सिरीज भाष्य करणार आहे.
भिमराव काशिनाथ मुडे दिग्दर्शित ‘कांड’ या वेबसीरिजचे पोस्टर सोशल मीडियाच्या माध्यमातून नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. एकीकडे या पोस्टरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तर दुसरीकडे ही वेब सिरीज कधी प्रदर्शित होणार..? याकडे काहींचे लक्ष लागून आहे. या वेबसीरिजचे लेखन मनवा नाईक, हरीश दुधाडे, भिमराव काशिनाथ मुडे यांनी केले आहे. तर प्लॅनेट मराठी आणि मॅन्यूएला क्रिएशन्स निर्मित या वेबसीरिजची निर्मिती अक्षय विलास बर्दापूरकर आणि मनवा नाईक यांनी केली आहे. लवकरच ही वेबसिरीज प्लॅनेट माथी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. अद्याप यात कोणकोणते कलाकार झळकणार याबद्दल माहिती समोर आलेली नाही.