चित्रपटगृहात लागणार ‘आणीबाणी’; मराठी कलाकारांकडून मोठी घोषणा


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। राज्यात कधी काय घडेल याची काहीही शाश्वती नसताना जेव्हा मनोरंजन विश्व देखील आणीबाणीकडे वाटचाल करतं तेव्हा धाकधूक होणे फारच साहजिक आहे. असं म्हणण्याचं कारण म्हणजे काही मराठी कळकरांनी नुकतीच ‘आणीबाणी’साठी सज्ज व्हा!! अशी घोषणा केली आहे. घोषणा कसली याला आपण फर्मानचं म्हणूया. आता हि आणीबाणी म्हणजे गंभीर प्रसंगा दरम्यान देशात लागू करावी लागते ती नव्हे तर मोठ्या पडद्यावर अनुभवायची आणीबाणी आहे. होय. हि मनोरंजनाची आणीबाणी आहे.

येत्या २८ जुलै २०२३ रोजी रुपेरी पडद्यावर ‘आणीबाणी’ लागू होणार आहे. उपेंद्र लिमये, प्रवीण तरडे, सयाजी शिंदे, संजय खापरे, वीणा जामकर, उषा नाईक, प्राजक्ता हनमघर, सीमा कुलकर्णी, रोहित कोकाटे, सुनील अभ्यंकर, पद्मनाभ बिंड, किशोर नांदलस्कर अशा मराठी सिनेविश्वातील दिग्गज कलाकारांचा या चित्रपटात समावेश आहे. हि ‘आणीबाणी’ मनोरंजनाची पर्वणी असणार आहे त्यामुळे घाबरण्याची गरज नाही. या दिग्ग्ज कलाकारांना एकत्र घेऊन सुप्रसिद्ध लेखक अरविंद जगताप यांच्या साथीने मराठी रुपेरी पडद्यावर दिनेश जगताप दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहेत.

‘दिनिशा फिल्म्स’ निर्मित ‘आणीबाणी’ हा आगामी मराठी चित्रपट २८ जुलै २०२३ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मराठी रुपेरी पडदद्यावर ‘आणीबाणी’ सारखा एक संवेदनशील विषय अतिशय रंजकपणे मांडण्याचं प्रयत्न दिग्दर्शक दिनेश जगताप यांनी लेखक अरविंद जगताप यांच्या साथीने केला आहे. या चित्रपटात एक ही हलकी-फुलकी गोष्ट आहे जी आपल्याला कळत नकळत बरंच काही शिकवून जाणार आहे. आता ही ‘आणीबाणी’ कोणासाठी अडचण ठरणार? आणि यातून कसे बाहेर पडणार? हे दाखवणारे रंजक कथानक या चित्रपटातून पहायला मिळणार आहे. कृष्णा जगताप, योगेश शिंदे, सचिन जगताप, अमोल महाडिक हे ‘आणीबाणी’ या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. तर कथा, पटकथा आणि संवाद अरविंद जगताप यांचे आहेत.