‘बनवायची होती लव्हस्टोरी पण गडबड झाली थोडी…’; ‘एक दोन तीन चार’ चित्रपटाचा भन्नाट टीझर पहाचं


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नुकताच शुक्रवारी बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित ‘झिम्मा २’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. एकीकडे या चित्रपटाची चर्चा असताना नुकताच आगामी चित्रपट ‘एक दोन तीन चार’चा धमाकेदार टीझर प्रदर्शित झाला आहे. जो सोशल मीडियावर व्हायरल होताच प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. जिओ स्टुडिओजच्या ‘झिम्मा २’नंतर आता ‘एक दोन तीन चार’ या चित्रपटाच्या रिलीजची प्रेक्षक वाट पाहू लागले आहेत.

जीव स्टुडिओज प्रस्तुत आणि ज्योती देशपांडे निर्मित एक भन्नाट नवीकोरी स्टोरी घेऊन ‘एक दोन तीन चार’ हा जबरदस्त चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. ‘एक दोन तीन चार’ हा चित्रपट आत्ताच्या तरुण पिढीच्या आयुष्यात डोकावताना दिसणार आहे. कारण या चित्रपटाची कथा प्रेम, लग्न आणि पुढे घडणाऱ्या हलक्या, फुलक्या, डेंजर प्रसंगांवर आधारलेली आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून एक हलकी फुलकी कॉमेडी आणि जबरदस्त विषयाची मांडणी आपण पाहू शकणार आहेत. या चित्रापाचे दिग्दर्शन वरूण नार्वेकर यांनी केले आहे. तर कथा, पटकथा आणि संवाद निपुण धर्माधिकारी व वरुण नार्वेकर यांनी मिळून लिहिले आहेत.

या टीझरमध्ये आपण पाहू शकतो कि, एक विवाहित जोडपं प्रेग्नेंसी टेस्ट करत आहे. पण मग या टेस्टच उत्तर पॉझिटिव्ह कि निगेटिव्ह हीच तर चित्रपटाची मजा आहे. जिओ स्टुडिओजच्या या चित्रपटातून सायली आणि समीर आपल्या भेटीला येत आहेत. या भूमिका अनुक्रमे वैदेही परशुरामी आणि निपुण धर्माधिकारी यांनी साकारल्या आहेत. हि नवीकोरी फ्रेश जोडी पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. वैदेही, निपुणशिवाय मृणाल कुलकर्णी, ऋषिकेश जोशी, सतीश आळेकर, शैला घाणेकर यांच्यादेखील महत्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट ५ जानेवारी २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे.