जॉनी लिव्हर आणि आपला सिद्धू घेऊन येतायत ‘अफलातून’ कॉमेडी; ट्रेलर पहा, खळखळून हसा


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीचा लाडका अभिनेता सिद्धार्थ जाधव आपल्या निखळ अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. तर कॉमेडीआहे बादशाह जॉनी लिव्हर त्यांच्याबद्दल तर बोलू तेव्हढं कमी. याशिवाय विजय पाटकर यांनी कॉमेडीचा एक दर्जा ठरवला आहे. त्यामुळे जेव्हा हे तिघे एकत्र येणार तेव्हा काय होणार याचा अंदाज आपण लावूच शकतो. नुकताचत्यांच्या ‘अफलातून’ या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झाला असून तो पाहताना खळखळून हसण्याची पूर्ण मुभा आहे. हा चित्रपट येत्या २१ जुलै २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे.

नुकताच ‘अफलातून’ या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. कलाकार, तंत्रज्ञ आणि इतर टीमच्या उपस्थितीत भव्य स्वरूपात हा ट्रेलर रिलीज करण्यात आला. या चित्रपटातून फुल्ल मनोरंजन होणार आहे. यामध्ये ३ मित्रांची धमाल केमिस्ट्री पहायला मिळणार आहे. यातील श्री पाहू शकत नाही. तर आदि ऐकू शकत नाही आणि मानव बोलू शकत नाही. असे असूनही हे तिघे डिटेक्टिव्ह आहेत आणि ते फसवल्या गेलेल्या मारियाला मदत करत आहेत. ही मदत करताना येणाऱ्या अडचणी आणि त्यांची रंजक मांडणी यामध्ये अतिशय भारी पद्धतीने केली आहे. ‘अफलातून’ चित्रपटात सिद्धार्थ जाधव, जॉनी लिव्हर, विजय पाटकर, श्वेता गुलाटी, तेजस्विनी लोणारी, भरत दाभोळकर, परितोष पेंटर, जयेश ठक्कर, जेसी लिव्हर, विष्णू मेहरा, रेशम टिपणीस असे एकापेक्षा एक कलाकार आहेत.

साहा अँडसन्स स्टुडिओज, आयडियाज द एंटरटेन्मेन्ट कंपनी आणि राजीव कुमार साहा हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. तर ग्रुप एम मोशन एंटरटेन्मेन्ट, अवधूत डिस्ट्रिब्युटर आणि स्वर्ण पट कथा यांच्या संयुक्त विद्यमाने चित्रपटाची सहनिर्मिती केली आहे. कथा- पटकथा परितोष पेंटर यांची अन संवाद संदीप दंडवते यांचे आहेत. छायांकन सुरेश देशमाने आणि संकलन सर्वेश परबचे आहे. मंदार चोळकर यांनी लिहिलेल्या गाण्यांना अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत यांचे स्वरसाज लाभला आहे. संगीताची जबाबदारी संगीतकार कश्यप सोमपुरा यांनी सांभाळली असून पार्श्वसंगीत कश्यप सोमपुरा आणि मलिक वार्सीयांचे आहे.