उत्कर्ष शिंदेने पुतणीसोबत बनवला मातीचा किल्ला; म्हणाला, ‘आजची पिढी संस्कृती विसरत चाललीये..’


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। संगीत कलाविश्वात गेली अनेक वर्ष अविरत संगीताची सेवा करत असलेलं शिंदे घरं सर्वांनाच माहित आहे. या घरातील चौथ्या पिढीने केवळ संगीत विश्वात नव्हे तर अभिनय विश्वात, वैद्यकीय क्षेत्रात आणि आता दिवाळीच्या मुहूर्तावर व्यवसाय क्षेत्रात पदार्पण केले हे. शिंदे कुटुंबाने पंढरपूर येथील वेळापूरमध्ये नुकताच पेट्रोल पंप सुरू केला आहे. ज्याला ‘आदर्श आनंद शिंदे’ असं नाव देण्यात आलं आहे. याबाबत उत्कर्ष शिंदेने पोस्ट करत माहिती दिली होती. यानंतर आता उत्कर्ष एक पोस्ट व्हायरल होत आहे. ज्यात आदर्शची लेक काका उत्कर्षसोबत किल्ला बनवताना दिसतेय.

या व्हिडिओत काका आणि पुतणी किल्ला बनवताना दिसत आहेत. शिवाय काका पुतणीला किल्ल्यासंदर्भातील माहितीदेखील देतोय. हि पोस्ट शेअर करताना उत्कर्षने लिहिलंय, ‘ ”मातीत कस राहिला नाही तर पीक कसदार येत नाही” आजची पिढी संस्कृती विसरत चाललीये असं कैक लोक सरास म्हणताना ऐकू येतात. पण, त्यातले किती जण तीच पिढी घडविण्यासाठी आपला वेळ देतात..? किती जण लहान मुलांच्या प्रश्नांना शांतपणे बालिश न म्हणता समजूतदार पणे उत्तर देतात..? आणि किती जण मीच खूप व्यस्त असतो हे उत्तर देऊन पळ काढण्यापेक्षा त्या लहानग्या मुलांना संस्कार घडविण्यासाठी प्रयत्नशील असतात..? हातात मोबाईल दिला आणि आपल्या मागची किटकिट संपली असा मानणाऱ्यांनो. हे लक्षात ठेवा. “मातीत कस राहिला नाही ना तर पीक कसदार येत नाही” महाराष्ट्र हे सणांचा संस्कृतीने नटलेलं राज्य आहे’.

‘लहानग्यांपासून ते ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकाला या सण-उत्सवाची ओढ असते. या उत्सवादरम्यानच्या, अनेक प्रथा- परंपरा प्रचलित आहे. लहान मुलांसाठी तर हा सण आनंदाच्या पर्वणीपेक्षा कमी नाही. दीपदानोत्सव असो की दीपावली की पाडवा. या सर्व गोष्टींची माहिती देऊन या ओल्या मातीला आकार देऊन सुंदर मूर्ती घडविण्याचं काम आपलं नाही का? या सणात किल्ले तयार करण्याची आपल्या महाराजांची आपल्या मावळ्यांची शौर्य गाथा सांगून या आधुनिक पिढीत ‘क्रेझ’ आपण निर्माण नाही करायची का? की स्पायडर मॅन, आयर्न मॅन हेच त्यांच्या मनावर बिंबवू द्यायचं..? आपल्या पूर्वजांनी केलेला इतिहास न वाचता न समजून घेता नवा इतिहास या नव्या पिढ्यांना घडवता येईल का..?’

‘काल माझी पुतणी अंतरा आदर्श शिंदेबरोबर गावी किल्ला सजावट करत बरंच काही चर्चा करत तिला शिकवता आलं. आमच्या शिंदेशाही परिवारात थोर पुरुषांचे विचार वाचून त्यावर विज्ञानवादी चर्चा करण्यावर जास्त भर दिला जातो. आणि मी घरी असलो की मैदानी खेळ क्रिकेट, पकडा पकडी, ट्रेकिंग, मुलांबरोबर डान्स, फायटिंग टास्क, ड्रॉईंग, पेंटिंग मस्ती सुरू राहते. आपली एनर्जी डबल होतेच पण त्यांना ही त्यांचं लहानपण छान एन्जॉय करता येतं. आपली पिढी हसत खेळत मज्जा करत वाढू द्या. आज या बालदिना निमित्ताने आपली पिढी विज्ञानवादी घडवूया. लक्षात ठेवा. “पीढ़ियां पढ़ेगी तभी आगे बढ़ेगी|” ‘