‘तुझं कौतुक थांबु नये..’; बायकोचा सिनेमा पाहून हेमंतने व्यक्त केला अभिमान

Kshitee_Hemant

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग आणि आलिया भट यांची मुख्य भूमिका असलेला ‘रॉकी और रानी की प्रेमकहानी’ चित्रपट शुक्रवार २८ जुलै २०२३ रोजी प्रदर्शित झाला. या सिनेमात मराठमोळी अभिनेत्री क्षिती जोग अत्यंत महत्वपूर्ण भूमिकेत आहे. सिनेमाच्या प्रीमिअर शोसाठी क्षिती तिचा पती आणि प्रसिद्ध मराठी अभिनेता व दिग्दर्शक हेमंत ढोमेला घेऊन गेली होती. हेमंतने … Read more

‘आपण प्रत्यक्षपणे नसलो तरी..; हेमांगीने शेअर केला ‘ब्लॅक अँड व्हाईट’ फॅमिली फोटो आणि लहानपणीची आठवण

Hemangi Kavi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री हेमांगी कवी ही सोशल मिडीयावर प्रचंड सक्रिय असते. उत्तम अभिनयासह परखड स्वभाव आणि थेट व्यक्त होण्यासाठी तिला जास्त ओळखले जाते. अनेकदा सोशल मीडियावर ती विविध पोस्ट शेअर करत अबोल विषयांना वाचा फोडताना दिसते. तर अनेकदा मनातील सल, दुःख, आठवणी शेअर करताना भावनिक होताना दिसते. अशीच एक बालपणीची आठवण … Read more

स्टार प्रवाह वाहिनीच्या नव्या मालिकेची घोषणा; तेजश्री प्रधान येतेय प्रेक्षकांच्या भेटीला

Tejashri Pradhan

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मालिका विश्वातील अत्यंत लोकप्रिय चेहरा अभिनेत्री तेजश्री प्रधान गेल्या बऱ्याच काळापासून कला विश्वापासून लांब आहे. झी मराठीवर लोकप्रिय ठरलेली मालिका ‘होणार सून मी ह्या घरची’मधून तिने साकारलेली जान्हवी आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. इतकेच काय तर याच वाहिनीवरील ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेत तिने शुभ्रा हे पात्र साकारले होते आणि पुन्हा एकदा प्रेक्षकांवर जादू … Read more

दमदार शुक्रवार!! ‘बाईपण भारी देवा’ थिएटरमध्ये मोफत पाहता येणार; कधी आणि कुठे..? लगेच जाणून घ्या

Baipan Bhaari Deva

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या बॉक्स ऑफिसवर केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट तुफान गाजतो आहे. दिनांक ३० जून २०२३ रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट चार आठवडे होऊनही थिएटरमध्ये कल्ला करतोय. या चित्रपटाचं सर्वाधिक क्रेझ महिला वर्गात पहायला मिळालं आहे. ‘बाईपण भारी देवा’ पहायला आजही प्रत्येक शोला थिएटरमध्ये गर्दी होतेय.अनेकदा चित्रपटाची तिकीटंदेखील मिळत नसल्याचे … Read more

OTT’ वरील काल्पनिक हिंसाचाराविषयी एव्हढी चिंता..?; सुव्रत जोशीने प्रेक्षकांना विचारलेले ‘ते’ प्रश्न चर्चेत

Suvrat Joshi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी कलाकार अभिनयाबरोबर सोशल मीडियावरील पोस्टमुळेही नेहमीच चर्चेत असतात. दररोजच्या घडामोडींवर ते परखड मतं मांडत असतात. त्यामुळे कधी कधी त्यांना ट्रोलिंगचाही सामनाही करावा लागतो. पण, त्यालाही ते चोख उत्तरं देतात. सध्या हिंदी मनोरंजनसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप उमटवणाऱ्या अभिनेता सुव्रत जोशी यानं त्याच्या पोस्टद्वारे सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ओटीटीवरील सेक्स व हिंसा … Read more

‘यज्ञसेनी’ कादंबरीवर आधारित ‘द्रौपदी’ सिनेमाची घोषणा; मोशन पोस्टर रिलीज

Draupadi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते राम कमल मुखर्जी रुक्मिणी मैत्रासोबत “द्रौपदी” हा चित्रपट तयार करणार असून बिनोदिनी-एकटी नातीर उपाख्यान, थिएटर लीजेंड बिनोदिनी दासी यांच्यावर आधारित बंगाली बायोपिक नंतर हा त्यांचा दुसरा मोठा बिग बजेट प्रोजेक्ट आहे. देव एन्टरटेन्मेंट व्हेंचर्स आणि प्रमोद फिल्म्स या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा महाभारताची जादुई कथा रुपेरी पडद्यावर … Read more

फिल्मसिटीत पुन्हा बिबट्या; मराठी मालिकेच्या सेटवर 200 लोकांचा जीव टांगणीला

Goregaon Filmcity

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मुंबईतील दादासाहेब फाळके चित्रपटनगरी म्हणजेच गोरेगाव फिल्मसिटीच्या आसपासचा संपुन परिसर हा जंगलाचा आहे. त्यामुळे अनेकदा विविध मालिका, चित्रपट, रिऍलिटी शोंच्या सेटवर वन्य प्राण्यांच्या शिरकावाचा अनुभव अनेकांनी घेतला आहे. पण गेल्या १० दिवसात आता चौथ्यांदा फिल्मसिटीमध्ये मालिकांच्या सेटवर बिबट्या घुसल्याची बातची समोर आली आहे. नुकताच एका मराठी मालिकेच्या सेटवर बिबट्या त्याच्या बछड्यासह घुसला … Read more

‘स्वर्गात जायचा रस्ता जितका कठीण..’; मराठी अभिनेत्रीने शेअर केला कोकण प्रवासाचा व्हिडीओ

Gauri Kiran

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। राज्यभारत पावसाने धुमाकूळ घातला असताना अनेक जण मान्सून ट्रिपचे नियोजन करत आहेत. आता पावसाळा म्हटलं कि, रस्त्यांची दूरवस्था, खड्डे, साचणारे पाणी हे सगळं आलंच. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर या सर्व विषयांवर गहन चर्चा सुरु आहेत. दरम्यान गणपती जवळ येतायत त्यामुळे आता चाकरमान्यांची कोकणात ये जा वाढणार. अशात पावसाळ्यामुळे कोकणात जायचे … Read more

बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीने केलं ‘बाईपण भारी देवा’चं कौतुक; म्हणाली, ‘खूप खूप खूप..’

Baipa Bhaari Deva

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट ३० जून २०२३ रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रदर्शित होऊन आता चार आठवडे पूर्ण झाले आहेत. आतापर्यंत या चित्रपटाने ६५ कोटींचा गल्ला पूर्ण केला आहे. तसेच या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड ब्रेक केले असून प्रेक्षकांच्या मनावर आपली छाप पाडली आहे. हि छाप केवळ प्रेक्षकांच्या नव्हे … Read more

‘माझ्या आयुष्यातील सर्वांत सुंदर व्यक्ती..’; मानसी नाईकची ‘या’ अभिनेत्रीसाठी खास पोस्ट

Manasi Naik_BhargaviChirmule

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेत्री मानसी नाईक हि सिनेविश्वातील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री आहे. केवळ अभिनेत्री नव्हे तर मानसी एक उत्तम नृत्यांगना आहे. मानसी नाईकचे ‘वाट बघतोय रिक्षावाला’ हे गाणे तुफान लोकप्रिय ठरले. या गाण्यामुळे खरं मानसी नाईक प्रसिद्धी झोतात आली. गेल्या काही महिन्यांपासून मानसी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेचा भाग राहीली. पण आता तिने एक नवी … Read more

‘या कपड्यांमधून बाहेर पडणं..’; ‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेला अभिनेत्याचा जड मनाने निरोप

Sunil Barve

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनवीर अशा अनेक मालिका आहेत ज्या प्रेक्षकांना दररोज न चुकता पाहतात. या सर्वच मालिकांमधील पात्रे प्रेक्षकांच्या दैनंदिन आयुष्याचा एक अविभाज्य भाग झालेली असतात. तसेच प्रेक्षकांकडून मिळणारे प्रेम, टीका, राग हा कलाकारांसाठी त्यांच्या कलेला मिळणारी दाद असते. अशी दाद ज्या भूमिकेसाठी मिळते ती भूमिका त्या त्या कलाकारासाठी देखील अत्यंत जवळची असते. … Read more

माझी हाऊसवाईफ होशील का? मराठी अभिनेत्रींला साडीमध्ये पाहून चाहत्यानं केलं प्रपोज?

Bhagyashree Mote

हॅलो बॉलिवूड मराठी : साडी नेसणं आता ट्रेंड झाला आहे. मुलींना साडीत पाहायला मुलांना खूप आवडतं. अशात एखाद्या अभिनेत्रीने साडी मधील आपला फोटो सोशल मिडीयावर शेअर केल्यावर त्यावर लाईक्सचा पाऊस पडतो. एका मराठी अभिनेत्रीने साडीमधला फोटो इंस्टाग्रामवर शेयर केला होता. त्यावर एका चाहत्याने चक्क माझी हाऊसवाईफ होशील का अशी कमेंट केली आहे. मराठी अभिनेत्री भाग्यश्री … Read more

माझ्या सुनेच्या मंगळागौरीला गाणं गायला येशील का..?; सावनीने सांगितलं भन्नाट किस्सा

Savaniee Ravindrra

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटातील ‘मंगळागौर’ हे गाणे तुफान लोकप्रिय ठरले आहे. या गाण्याची गायिका सावनी रविंद्र ही मराठी मनोरंजन सृष्टीतील आघाडीच्या गायिकांपैकी एक आहे. आतापर्यंत तिने अनेक दर्जेदार गाणी गायली आहेत. पण ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटासाठी तिने गायलेल्या ‘मंगळागौर’ गाण्याने महिला वर्गाचा चंगळच लक्ष वेधून घेतला आहे. … Read more

‘धोती, सदरा, कोट आणि टोपी..’; आगामी चित्रपटात अभिनेते शरद पोंक्षे साकारणार ‘ही’ भूमिका

Sharad Ponkshe

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘ठिपक्यांची रांगोळी’ ही टीआरपीच्या बाबतीत आघाडीवर आहे. या मालिकेतील कलाकारांनी प्रेक्षकांच्या केवळ घरात नव्हे तर मनामनांत जागा मिळवली आहे. दरम्यान मालिकेत ‘दादा काका’ हे गंभीर मात्र अत्यंत महत्वपूर्ण पात्र साकारणारे अभिनेते शरद पोंक्षे यांनी नुकताच मालिकेला रामराम ठोकला आहे. त्यांच्या जागी आता मालिकेत अभिनेते उदय टिकेकर दादा … Read more

‘त्या’ पुरुषांची जात नराधम..; मणिपूर घटनेसंदर्भात सोनाली कुलकर्णीची संतप्त पोस्ट

Sonali Kulkarni

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मणिपूरमध्ये २ महिलांवर करण्यात आलेल्या अत्याचाराच्या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. महिलांना नग्न करत त्यांची धिंड काढून त्यांच्यावर सामूहिक बलात्कार करण्यासारखी अत्यंत लाजिरवाणी घटना घडल्यापासून कुणाचाच जीव थाऱ्यावर नाही हे येणाऱ्या प्रतिक्रियांमधून समजत आहे. सामान्य नागरिक, राजकीय नेते मंडळी, बॉलिवूड सेलिब्रिटी आणि अनेक मराठी कलाकारांनीदेखील यावर संताप … Read more