पिंकीने साधला गणेश चतुर्थीचा मुहूर्त; अभिनेत्रीने गुपचूप उरकला साखरपुडा


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘पिंकीचा विजय असो’ ही सध्या टीआरपीमध्ये इतर मालिकांना चांगलीच स्पर्धा देते आहे. या मालिकेत पिंकीची मुख्य भुमिका साकारणारी अभिनेत्री शरयू सोनावणे लोकप्रिय झाली आहे. दरम्यान शरयूचा चाहता वर्ग चांगलाच वाढत चालला आहे. दरम्यान एकीकडे राज्यभरात गणेशोत्सवाचा जल्लोष सुरु आहे. तर दुसरीकडे गणेश चतुर्थीचा मुहूर्त साधत अभिनेत्री शरयू सोनावणेने गुपचुप साखरपुडा उरकला आहे.

शरयूने स्वतःच्या साखरपुड्याची बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून देत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. तिने अधीकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर थेट साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत. साखरपुड्याचा रोमॅंटीक फोटो शेअर करत तिने आपल्या चाहत्यांना जोडीदाराची ओळख करून दिली आहे. या फोटोंडोन्ट तिने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे कि, ‘आयुष्यभरासाठी एका व्यक्तीला त्रास देण्याचं मी ठरवलं आहे. Happy and engaged…!! गणपती बाप्पा मोरया!!’

शरयूची हि पोस्ट तुफान व्हायरल होत असून यावर तिचे चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. अभिनेत्री शरयू सोनावणेने गुपचुप साखरपूडा केला असून तिच्या होणाऱ्या पतीविषयी जाणून घेण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत. तर शरयूच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव जयंत लाडे असे आहे. जयंत हा एक फिल्ममेकर आणि निर्माता आहे. शरयूनेबद्दल सांगायचं झालं तर, काही दिवसांपूर्वीच तिने ‘पिंकीचा विजय असो’ मालिकेला रामराम ठोकला आहे. या मालिकेत पिंकीची भूमिका साकारत तिने प्रेक्षकांच्या मनामध्ये जागा निर्माण केली आहे. त्यामुळे तिने मालिका सोडल्यानंतर प्रेक्षक नाराज झाले होते.