‘ती कंप्लिटली मॅरेज मटेरियल…’ लग्नानंतर पहिल्यांदाच सुरुचीबद्दल बोलला पियुष


नुकतेच काही दिवसापूर्वी अभिनेत्री सुरुची आडारकर आणि अभिनेता पियुष रानडे यांनी लग्नगाठ बांधली. त्यांच्या रिलेशनबद्दल कोणाला काहीच कल्पना नव्हती. त्यांनी सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर करून सगळ्यांना आनंदाचा धक्का दिला. सोबत सुरूचीने नवीन आयुष्याची सुरुवात केली आहे. आता लग्नानंतर पहिल्यांदाच पियूषने एका मुलाखतीमध्ये सुरुचीबद्दल भाष्य केले आहे.

माध्यमांना दिलेल्या मुलाखतीमध्ये पियुष आणि सुरुची त्यांच्या सिक्रेट वेडिंगबद्दल सांगितले. त्यांना पहिलं प्रपोज कोणी केला असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी पियुषने सांगितले की, “मी सुरूचीला कधी डेटसाठी किंवा चल फिरायला जाऊ मग बघू असं नाही विचारू शकत नाही. मी तिला सुरूची चल लग्न करूया असं म्हणू शकतो. कारण ती मॅरेज मटेरियल आहे. जर मला तिच्या बाबतीत खात्री आहे तर मी तिला लग्नासाठीच विचारेल.”

पुढे तो म्हणाला की, “मला कोणत्याही रिलेशनशिप वगैरे या सगळ्या गोष्टी नको होत्या. लग्न वगैरे तर खूप पुढची गोष्ट.. मी एकटाच आनंदी होतो. तिलाही या गोष्टी माहीत होत्या. आमच्यात प्रेम होतं. हे दोघांनाही माहीत होतं..पण प्रेम आहे म्हणून लग्न करायचा असा आमच्यापैकी कोणीही केलं नाही. आम्ही आमचा वेळ घेतला. आज काल आपण स्पेस हवी असं फक्त म्हणतो. पण सुरूचीने न सांगता मला ती दिली सुरुचीला पहिल्यापासून लग्न करायचं होतं. पण मला तिने वेळ दिला काही वर्षानंतर मग मी तिला लग्न करूया असं सांगितलं.”

हेही वाचा – मनसोक्त हसणारी ‘पारू’.. बिनधास्त जगणारे ‘शिवा’; झी मराठीवर सुरु होणार दोन नव्या मालिका

याआधी पियुष आणि सुरुची यांनी अंजली या मालिकेत एकत्र काम केलं होतं. तीन वर्षे त्यांनी डेट केल्याने त्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. हे पियूषचे तिसरे लग्न आहे. पहिलं लग्न त्याने शाल्मली तोळेसोबत केलं होतं. त्यानंतर काही दिवसातच त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर त्याने मयुरी वाघसोबत दुसरे लग्न केलं. परंतु ते लग्नही जास्त काळ टिकू शकले नाही. आणि आत्ता पियुष आणि सुरूची यांनी लग्न केलेले आहे.