Pooja Sawant Engagement – We are engaged..!! पूजा सावंतने उरकला साखरपुडा; फोटो शेअर करत दिला चाहत्यांना सुखद धक्का


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। (Pooja Sawant Engagement) कलरफुल.. अशी ओळख असलेली मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री पूजा सावंतने अभिनयाच्या जोरावर सिनेविश्वात स्वतःची एक खास ओळख निर्माण केली आहे. केवळ मराठी नव्हे तर हिंदीतही पूजाने पाय रोवले आहेत. त्यामुळे पूजाचा चाहता वर्ग फार मोठा आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून पूजा आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते आणि या माध्यमातून ती वैयत्तिक आयुष्यातील बऱ्याच गोष्टी शेअर करते. नुकताच तिने आपल्या चाहत्यांना अत्यंत सुखद धक्का देत साखरपुडा उरकल्याची माहिती दिली आहे.

Pooja Sawant Engagement

सुंदर आणि सोज्वळ अभिनेत्री पूजा सावंतने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत तिच्यासोबत एक मुलगा दिसत आहे. ज्याला तिने मिठी मारली आहे आणि बोटातील अंगठी फ्लोन्ट करते आहे.

या फोटोंसोबत तिने कॅप्शन देत लिहिलंय कि, ‘माझ्या आयुष्यातील एका नवीन अध्यायासाठी मी सज्ज झाले आहे. ही प्रेमाची जादू असून आम्ही आमचा सुंदर प्रवास सुरु करत आहोत. We are engaged’. पूजा सावंतच्या या पोस्टवरून हे स्पष्ट होत आहे कि पूजाचा साखरपुडा झाला असून लवकरच ती लग्न बंधनात अडकणार आहे. (Pooja Sawant Engagement)

दरम्यान पूजा सावंतने इंस्टाग्रामवर सलग तीन पोस्ट शेअर केल्या आहेत. पण यातील एकही फोटोत तिने तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा चेहरा दाखवलेला नाही. समुद्रकिनारी केलेल्या या खास फोटोशूटसाठी पूजाने आणि तिच्या होणाऱ्या नवऱ्याने व्हाईट रंगाचे कपडे परिधान केले आहेत. (Pooja Sawant Engagement) सध्या सोशल मीडियावर पूजा सावंतचा होणारा नवरा कोण आहे..? याबाबत मोठी चर्चा रंगली आहे. दरम्यान पूजाच्या या पोस्टवर चाहते, नेटकरी आणि सिनेविश्वात अनेक कलाकार मंडळी कमेंट करत तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.