अधीर मन झाले!! पूजा सावंतला येतेय होणाऱ्या नवऱ्याची आठवण; पोस्ट शेअर करत म्हणाली..


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेत्री पूजा सावंत हि सध्या तिचा आगामी चित्रपट ‘मुसाफिरा’मुळे प्रचंड चर्चेत आहे. हा चित्रपट येत्या २ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रदर्शित होणार असून सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये ती व्यस्त आहे. दरम्यान प्रोफेशनल आयुष्यासोबतचं पर्सनल आयुष्यामुळेही पूजा सावंत चर्चेत आहे. येत्या महिन्यात ती लग्नबंधनात अडकणार आहे. तत्पूर्वी सोशल मीडियावर पूजा आणि तिच्या होणाऱ्या नवऱ्याच्या पोस्ट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. अलीकडेच पूजाच्या वाढदिवशी तिच्या नवऱ्याने शेअर केलेली रोमँटिक पोस्ट व्हायरल झाली होती. यानंतर आता पूजेची एक पोस्ट चर्चेत आली आहे.

अभिनेत्री पूजा सावंत हि एकीकडे ‘मुसाफिरा’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. तर दुसरीकडे तिने होणाऱ्या नवऱ्याच्या आठवणीत एक खास पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये पूजा सावंतने तिचा होणारा नवरा सिद्धेश चव्हाणसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना पूजाने लिहिलं आहे कि, ‘प्रमोशनच्या व्यग्र वेळापत्रकात… मला काय हवंय हे मलाच माहिती आहे…. लवकर भेट सिद्धेश’. पूजाच्या या पोस्टवर सिद्धेशनेसुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. ज्यामध्ये त्याने ‘बोजू, तुझी खूप आठवणं येतेय. तुला भेटण्याची वाट पाहतोय’, असे लिहिले आहे.

पूजाच्या या पोस्टवर अनेकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. दरम्यान, येत्या महिन्यात अभिनेत्री पूजा सावंत आणि सिद्धेश चव्हाण हे लग्नबंधनात अडकणार आहेत असे समोर आले आहे. अद्याप दोघांच्या लग्नाची पक्की तारीख आणि स्थळाबाबत काही माहिती समोर आलेली नाही. मात्र याच वर्षी आणि अगदी महिन्याभरातच त्यांच्या लग्नाचा बार उडेल अशी शक्यता आहे. पूजाच्या वाढदिवशी तिच्या मित्र मैत्रिणींनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये येत्या महिन्यात ती लग्न बंधनात अडकणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.