Pooja Sawant | लग्नानंतर सिनेसृष्टी सोडून पूजा सावंत होणार ऑस्ट्रेलियात स्थायिक? अभिनेत्रींचे ते वक्तव्य चर्चेत


Pooja Sawant| अभिनेत्री पूजा सावंत ही एक महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री आहे. आणि मालिका तसेच चित्रपटातून तिने तिच्या अभिनयाचे कौशल्य तिच्या चाहत्यांना आणि प्रेक्षकांना दाखवले आहे. सध्या पूजा सावंत तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही आयुष्यात खूप बिझी आहे. अनेक गोष्टींची माहिती ती सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांना देत असते.

नुकतेच काही दिवसापूर्वी पूजा सावंतने साखरपुडा झाल्याची खुशखबर देऊन तिच्या चाहत्यांना सुखाचा धक्का दिला होता. तिने सिद्धेश चव्हाणसोबत साखरपुडा केला आहे आणि लवकरच ते लग्न गाठ बांधणार आहेत.

हेही वाचा – ‘प्रत्येक भागात ओव्हर अ‍ॅक्टिंग…’; बिग बॉस मराठी फेम अभिनेत्रीची अंकिता लोखंडेवर टीका

सिद्धेश चव्हाण हा ऑस्ट्रेलियामध्ये राहतो त्यामुळे आता लग्न झाल्यानंतर पूजा देखील चित्रपटसृष्टी सोडून ऑस्ट्रेलियामध्ये त्याच्यासोबत स्थायीक असल्याची चर्चा सर्वत्र चांगल्या होत्या. त्यामुळे आता पूजा इथून पुढे कोणत्याही चित्रपटात दिसणार नाही. अशी देखील चर्चा चालू होती. अशातच पूजा नाही या सगळ्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे आणि तिचे मत व्यक्त केलेले आहे.

नुकतेच माध्यमांना दिलेल्या मुलाखतीमध्ये पूजाने सांगितले की, “सिद्धेश कायमस्वरूपी ऑस्ट्रेलियात राहत नाही. तो अलीकडेच दोन वर्षांपूर्वी तिकडे शिफ्ट झाला आहे. तो मूळचा मुंबईचा असून त्याच्या आई-बाबा मुंबईतच आहे. त्यामुळे आम्ही सगळे मुंबईमध्ये राहणार आहोत.”

पुढे पूजा म्हणाली की, “सिद्धेश अजून काही वर्ष ऑस्ट्रेलियात राहणार आहे. त्यामुळे मी देखील काही वर्षे तिकडे येऊन जाऊन करेल. हे अरेंज मॅरेज असल्यामुळे आम्ही सगळ्या गोष्टींसाठी तयार आहोत.”

पूजा डेस्टिनेशन वेडिंग करणार असल्याचे देखील चर्चा चालू होती. परंतु पूजाने या सगळ्या चर्चांना भेदून ती मुंबईमध्येच लग्न करत असल्याची माहिती देखील माध्यमांना दिलेली आहे. परंतु पूजा आताच सिनेमासृष्टी सोडणार नाही. हे ऐकून तिच्या चाहत्यांना खूप जास्त आनंद झालेला आहे.

काही दिवसातच पूजा सावंत हिचा मुसाफिरा हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता पुष्कर जोक देखील आपल्याला दिसणार आहे.