काय समजलीव..? MHJ फेम प्रभाकर मोरेंच्या लेकीचे अभिनय क्षेत्रात पदार्पण; पोस्ट शेअर करत म्हणाले..


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठीच्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कॉमिक कार्यक्रमातून प्रेक्षकांना लोटपोट करत हसवणारे अनेक विनोदवीर प्रसिद्धी झोतात आले. ज्यामध्ये ‘चिपळूणचे पारसमणी’ अर्थात अभिनेते प्रभाकर मोरे यांचाही समावेश आहे. आपल्या विनोदी शैलीने आणि कोकणी बोलीभाषेमुळे प्रभाकर मोरेंची प्रेक्षकांवर एक वेगळीच छाप पडली आहे. यानंतर आता त्यांची लेक अभिनय विश्वात पदार्पण करत असल्याचे समजत आहे. प्रभाकर मोरे यांनी स्वतःच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे.

अभिनेते प्रभाकर मोरे सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत ते चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असतात. ते अनेकदा आपल्या कुटुंबासोबतचे फोटोदेखील शेअर करताना दिसतात. दरम्यान, प्रभाकर मोरेंनी आज सोशल मीडियावर एक आनंदाची बातमी दिली आहे. आपल्या चाहत्यांसोबत हि बातमी शेअर करताना त्यांनी लेकीसोबतचा फोटोदेखील शेअर केला आहे. प्रभाकर मोरे यांची लेकही आता लवकरच अभिनय क्षेत्रात प्रवेश करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

प्रभाकर मोरेंनी शेअर केलेल्या या फोटोमध्ये त्यांची मुलगी स्क्रीनसमोर उभी असल्याचे दिसून येत आहे. तर स्क्रीनवर प्रभाकर मोरे आणि ती सीन करताना दिसत आहेत. हा फोटो शेअर करताना त्यांनी लिहिलं कि, ‘ ”परदा” लघुपट. माझ्या लेकीचा पहिलाच प्रोजेक्ट आणि तोही माझ्याबरोबर. खूप अभिमान वाटत आहे’. प्रभाकर मोरे पहिल्यांदाच त्यांच्या लेकीबरोबर स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. त्यामुळे बाप- लेक दोघे जितके आनंदी आहेत तितकाच आनंद त्यांच्या चाहत्यांना देखील होतोय. या पोस्टवर अनेकांनी प्रभाकर मोरेंच्या लेकीचे अभिनंदन केले आहे.