प्राजक्ताच्या आयुष्यात आणखी एका कामगिरीची नोंद; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’22 देश… 630 लोक ..’


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वात अभिनेत्री प्राजक्ता माळी हे नाव चांगलंच गाजतंय. केवळ अभिनेत्री म्हणून नव्हे तर प्राजक्ता एक व्यावसायिक आणि उत्तम निवेदिका म्हणून देखील ओळखली जाते. सोशल मीडियावर तर कायम प्राजक्ता माळीची चर्चा सुरूच असते. आता सोशल मीडियावर प्राजक्ता चर्चेचा विषय ठरली आहे. नुकतीच प्राजक्ताने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक खास पोस्ट शेअर केली आहे. आयुष्यात एक खास गोष्ट प्राजक्ताने पूर्ण केली आहे आणि त्याची माहिती तिने शेअर केली आहे.

अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर फार सक्रिय असते. त्यामुळे या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहताना दिसते. नुकतंच तिने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात ती बँगलोर येथील आर्ट ऑफ लिव्हिंग आश्रमाबाहेर उभी असलेली दिसते आहे. गेल्या अनेक दिवसांपासुन ती श्री श्री रविशंकर यांचा आर्ट ऑफ लिव्हिंग कोर्स करत असल्याचे तिने याआधीच सांगितले आहे. याविषयीची माहिती सोशल मीडियावर शेअर करताना तिने आर्ट ऑफ लिव्हिंगचा फाऊंडेशन कोर्स पूर्ण केल्याचे सांगितले आहे.

प्राजक्ताने आर्ट ऑफ लिव्हिंग कोर्स पूर्ण केल्यावर सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत आपला आनंद व्यक्त केला आहे. तिने या पोस्टमध्ये आर्ट ऑफ लिव्हिंगचे कोर्समधले काही व्हिडीओ शेअर केले आहेत. हे व्हिडीओ शेअर करताना प्राजक्ताने लिहिले आहे कि, ‘मी आता स्वतःला “गुरूपूजा पंडीत” म्हणु शकते का..? काल बॅंगलोर आश्रमात Art of living foundation चा -“गुरूपूजा” course पुर्ण केला.. तब्बल २२ देश आणि सबंध भारतातून ६३० जण ह्यात सहभागी झाले होते. ह्या course ला किती महत्व आहे, हे आर्ट ऑफ लिव्हिंग कुटुंब समजू शकेल. माझ्या आयुष्यात आणखी एका कामगिरीची नोंद’. प्राजक्ताची हि पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असून तिचे चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.