‘डोक्यावर ग्लास, जमाल कुडूवर डान्स.. चुलीवर भाकऱ्या अन..’; प्राजक्ताची फॅमिलीसोबत धमाल


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्राजक्ता माळी हे मराठी कलाविश्वातील अत्यंत लोकप्रिय नाव आहे. आपल्या सुंदर आणि तेजस्वी सौंदर्यासोबत कमालीच्या अभिनय शैलीच्या जोरावर प्राजक्ताने स्वतःचा चाहता वर्ग निर्माण केला आहे. शिवाय प्राजक्ता सोशल मीडियावर फार सक्रिय असते. त्यामुळे कामाच्या अपडेट्ससोबत वैयक्तिक आयुष्यातील बऱ्याच गोष्टी ती या माध्यमातून चाहत्यांसह शेअर करताना दिसते. गेल्या वर्षाचा शेवटचा दिवस म्हणजेच ३१ डिसेंबर तिने आपल्या फॅमिलीसोबत एन्जॉय केला. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

उत्तम अभिनेत्री, कवयित्री, नृत्यागंना, सूत्रसंचालिका आणि व्यावसायिका अशी प्राजक्ता माळीची ओळख आहे. कामात अतिशय व्यस्त असूनही ती अनेकदा फॅमिलीसाठी आवर्जून वेळ काढताना दिसते. इतकेच नव्हे तर छोट्या मोठ्या ट्रिप, सण, उत्सव ती फॅमिलीसोबत साजरे करताना दिसते. ज्याचे फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर शेअर करते. सरत्या वर्षाला निरोप देताना देखील तिने फॅमिलीसोबत धमाल केली. ज्याचा व्हिडीओ प्राजक्ताने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

या व्हिडिओत प्राजक्ता माळीने ३१ डिसेंबर कसा साजरा केला ते दाखवले आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने लिहिलंय, ‘हे ३१ डिसेंबर संदर्भातील… आमचे बॉबी देओल आणि डॉन… २०२३ चा शेवटचा आणि २०२४ चा पहिला सेल्फी… नवीन वर्षातली पहिली पोस्ट… नवीन वर्षाच्या शुभेच्छा…’. या व्हिडिओत प्राजक्ता आणि तिचे कुटुंबीय ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटातील बॉबी देओलच्या ‘जमाल कडू’ गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. ज्यासाठी प्रत्येकाने डोक्यावर ग्लास, बॉटल, पाण्याचा जग ठेवला आहे. यानंतर ते ‘डॉन’ गाण्यावर थिरकले आणि याच व्हिडिओत प्राजक्ता चक्क चुलीवर भाकऱ्या करताना दिसते आहे. तिचा हा व्हिडीओ खूप व्हायरल झाला आहे.