चित्रपटश्रुष्टी सोडून ‘हि’ मराठी अभिनेत्री रमली शेतीत? फार्महाउसवरील फोटो पहा


Prajakta Mali Farm House : चित्रपटाचे शूटिंग आणि रिलीज या दोन्ही प्रक्रिया कलाकारांसाठी खूपच हेक्टिक असतात. शूटिंगसाठी कलाकारांना अनेकदा खूप लांब प्रवास करावा लागतो तर कधी रात्री अपरात्रीसुद्धा दिग्दर्शकाच्या गरजेनुसार शूटसाठी जावं लागते. एकंदर या सगळ्या प्रक्रियेत कलाकार मात्र चांगलेच वैतागतात. पण इतरांप्रमाणे कलाकारांना चिडचिडही करता येत नाही अन चेहऱ्यावर उदासीनताही दाखवून चालत नाही. परिणामी प्रत्येकाला गरज असते ती एका छोट्याशा रिफ्रेश करणाऱ्या ब्रेकची.

आजकाल प्रत्येक सेलिब्रिटींचे स्वतःचे असे आलिशान फार्महाउस आहेत. अगदी अमिताभ बच्चन ते सचिन तेंडुलकर अशा दिग्गजांचे एक नव्हे तर अनेक शहरांत स्वतःचे फार्म हाऊस, व्हिला आहेत. आता यामध्ये मराठी कलाकारसुद्धा मागे राहिलेले नाहीत. मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी तिच्या कर्जत येथील फार्महाऊसचे अनेकदा सुंदर फोटो आपल्या इंस्टाग्रामवर पोस्ट करत असते. नुकताच प्राजक्ताने अशाच एक फोटो पोस्ट केला आहे.

प्रत्येक शूट अन रिलीजनंतर येथे येऊन रिफ्रेश होणं म्हणजे एक वेगळाच आनंद असल्याचं तीन या पोस्टमध्ये म्हटलं आहे. याचसाठी केला होता हट्टहास असे कॅप्शन प्राजक्ताने या पोस्टला दिले आहे. तिचा फोटो अनेक चाहते ओळखू शकणार नाहीत. कोणी म्हणेल कि हि कोणती मराठी अभिनेत्री आहे जी निवांत झोपाळ्यावर झोपून, गवत कापताना फोटो काढून पोस्ट करतेय. पण प्राजक्ता तिचं फार्महाउस लाईफ मस्त एन्जॉय करत आहे हे या फोटोंमधून दिसत आहे.