Prajakta Mali | ‘इतकी’ होती प्राजक्ता माळीची पहिली कमाई, स्वतः अभिनेत्रीने केला खुलासा


Prajakta Mali | प्राजक्ता माळी ही मराठी सिनेसृष्टीतील एक अत्यंत नावाजलेली आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे. मालिकेतून पदार्पण केलेली प्राजक्ता आजकाल यशाचे शिखर गाठताना दिसत आहे. आज ती अनेक चित्रपट तसेच मालिकांमध्ये काम करत आहे. परंतु तुम्हाला प्राजक्ता माळीची पहिली कमाई किती होती हे माहित आहे का? अभिनेत्रीने नुकताच एका मुलाखती तिच्या पहिल्या कमाईचा उल्लेख केलेला आहे.

एका मुलाखती मध्य प्राजक्ताने तिचा पहिले पगार सांगितला आहे. तिला तिचा पहिला पगार विचारला यावरत म्हणाली “मी खूप लहानपणापासूनच काम करत आली आहे. सहावी ते सातवी असताना मी डान्सचे कार्यक्रम केले होते. त्यावेळी मला कमी पैसे मिळायचे तांदळा एक मूखवटासाठी तब्बल चार हजार रुपये मिळाले होते ही इंडस्ट्रीतली माझी पहिली कमाई होती.”

पुढे ती म्हणाली, “मला गुड मॉर्निंग महाराष्ट्रसाठी दर महिन्याला 58 ते 60 हजार रुपये मिळायचे.”या पैशातून माझा प्रवास खर्च माझे शिक्षण व इतर खर्च भागवत होता. या पैशातून मी घरी खर्चालाही पैसे देत होते त्यामुळे त्या कमाईतून मला आनंद होत होता.”

प्राजक्ता माळी ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. इंस्टाग्रामवर देखील तिचे लाखो फॉलॉवर्स आहे. ती नेहमीच नवनवीन गोष्टी सोशल मीडियावर शेअर करत असते.तिचा प्राजक्ता राजा दागिन्यांचा ब्रँड देखील चालू आहे.