हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेत्री प्राजक्ता माळी ही आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. मालिका, सिरीज, चित्रपटांमधून आणि आपल्या उत्तम निवेदन कौशल्याच्या बळावर ती कला विश्वात घट्ट पाय रोवून उभी राहिली आहे. नुकतंच प्राजक्ताने यंदाची दिवाळी कशी साजरी केली, याबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. जी चांगलीच व्हायरल झाली आहे.
अभिनेत्री प्राजक्ता माळीने या पोस्टमध्ये काही फोटो शेअर केले आहेत. यातील पहिल्या फोटोत तिचे संपूर्ण कुटुंब दिसत आहे. पुढे जेवणाचं ताट, भाऊबीजेची ओवाळणी, शॉपिंग आणि भाच्यांचा घेतलेला अभ्यास असे हे फोटो आहेत. सोबतच प्राजक्ताने लिहिलं आहे कि, ‘सण दिपावली…. संपूच नये असं वाटतं.. (फोटो दुसरा – यावेळी थेट भारती हॅास्पिटलच्या आयूर्वेद सेंटर मध्ये जाऊन भाच्यांना अभ्यंग घडवले.)
1- Abhyang
2- Shopping
3- Watching film in theatre
4- Hoteling
5- Niece’s Diwali Homework.
Attu’s Diwali bucket list completed
भाच्यांचाहट्ट #बालहट्ट दोन फुलबाजेही उडवले. #कुटूंब सालाबादप्रमाणे फराळ खाऊन १ किलो वजनही वाढलंय…’.
प्राजक्ताने हि पोस्ट अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. तिच्या या फोटोवर अनेक चाहते प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. यावर अनेकांनी हार्ट इमोजी शेअर केले आहेत. तर अनेक नेटकऱ्यांनी या पोस्टवर कमेंट करत प्राजक्ताला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. इतकंच नव्हे तर खूप छान सेलिब्रेशन केले असेही म्हणत आहेत. एका नेटकऱ्याने ‘ही पण दिवाळी गेली प्राजू.. लग्न कधी करणार ग पोरी..?’ असा सवाल देखील केला आहे.