‘अरुणोदय झाला..’; राम मंदिर प्राणप्रतिष्ठेसंदर्भात प्राजक्ता माळीने शेअर केली पोस्ट


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आज दिनांक २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्त देशभरात मोठा उत्साह आणि आनंद व्यक्त केला जात आहे. याबाबत अनेक कलाकार मंडळींनी सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत आपला आनंद व्यक्त केला आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज राम मंदिरात प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जातेय. दरम्यान मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीने या संदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे.

अभिनेत्री प्राजक्ता माळीने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर हि पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलंय कि,
‘शतकांच्या यज्ञातून उठली
एक केशरी ज्वाळा…
दहा दिशांच्या ह्रदयामधूनी
अरुणोदय झाला…
२२ जानेवारी २०२४. सगळं सुंदर, मंगलमय, पावित्र्यपुर्ण असू दे; प्राणप्रतिष्ठा शांततेत पार पडू दे. ही प्रत्येक “भारतीयाची” भावना असू दे’

प्राजक्ताने शेअर केलेली हि पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या पोस्टवर अनेक कलाकार मंडळी तसेच नेटकरी ‘जय श्री राम’, ‘करो राजतिलक कि तैय्यारी.. आ रहे है भगवाधारी’, ‘स्वप्नपूर्ती’, ‘आनंद सोहळा’ अशा प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. दरम्यान, आज अयोध्येतच नव्हे तर सर्वत्र दिवाळी साजरी केली जात आहे. अयोध्येत राममंदिर व्हावे हे अनेकांचे स्वप्न होते आणि आज ते पूर्ण होत आहे. त्यामुळे ठिकठिकाणी आजचा आनंद सोहळा विशेष पद्धतीने साजरा केला जात आहे.