हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्राजक्ता माळी हि मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. विविध मालिका, चित्रपट, सीरिजच्या माध्यमातून कायम प्राजक्ताने वेगवेगळ्या ढंगाच्या भूमिका साकारल्या आहेत. प्रत्येक भूमिकेतून तिने कायम प्रेक्षकांवर एक छाप सोडली आहे. दरम्यान सोशल मीडियावर सक्रिय असल्यामुळे ती काही ना काही पोस्ट शेअर करताना दिसते. प्राजक्ताच्या प्रत्येक पोस्टला चांगले लाईक्स आणि कमेंट्स मिळतात. आज जगभरात दहीहंडीचा सण साजरा केला जात असताना एक खास पोस्ट शेअर करत तिने बाळगोपाळांना सल्ला दिलाय.
अभिनेत्री प्राजक्ता माळीने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हँडल इंस्टाग्रामच्या माध्यमातून एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने स्वतःचे साडीतील काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. यासोबत कॅप्शनमध्ये तिने लिहिले आहे कि, ‘सगळ्यांना गोपाळकाल्याच्या हार्दिक शुभेच्छा.. सर्व गोविंदान्नो, जपून मनोरे रचा… स्वतःची काळजी घ्या. सिर सलामत तो पगड़ी पचास।’ यासोबत तिने गोपाळकाला, उत्सव, खेळ, आनंद, श्रावण, सणवार असे हॅशटॅग वापरले आहेत.
प्राजक्ताने शेअर केलेल्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलंय कि, ‘राधा इकडे आहे.. मग गोपाळांमध्ये चाललंय कोण..’. तसेच आणखी एकाने म्हटले आहे कि, ‘गोपाळकाल्याच्या दिवसातला दही हंडी हा एकमेव असा सण आहे, ज्या दिवशी एक मराठी माणूस दुसऱ्या मराठी माणसाला वर जाण्यासाठी मदत करतो. आजच्या दिवसात आंतरजालावर(internet)सतत फिरत असणारी ओळ चिकटवून टाकली’.