हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री प्राजक्ता माळी ही सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. कधी हटके लूक, तर कधी तिच्या ज्वेलरी ब्रॅण्डबद्दल ती सोशल मीडियावर माहिती देताना दिसते. प्राजक्ताला सोशल मीडियावर फॉलो करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. प्राजक्ता एक उत्तम अभिनेत्री, उत्तम सूत्रसंचालिका आहे. त्यामुळे मनोरंजन विश्वात प्राजक्ताची कायम हवा असते. तिचा चाहता वर्ग नेहमीच तिच्या प्रोजेक्टबाबत उत्सुक असतो. अशातच प्राजक्ताने यशाची आणखी एक पायरी चढत स्वतःच एक आलिशान घर घेतल्याची माहिती तिने दिली आणि सगळ्यांना आनंदाचा धक्का दिला आहे.
अभिनेत्री प्राजक्ता माळी ही सोशल मिडीयावर प्रचंड सक्रिय असते. त्यामुळे ती नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहताना दिसते. प्राजक्ताने स्वतःचं नवीन घर घेतल्याची माहिती देखील सोशल मिडीयावर पोस्ट करत दिली आहे. प्राजक्ताने भलंमोठं कर्ज काढून हे नवं घर घेतलंय. प्राजक्ताला तिच्या स्वप्नपूर्तीचा आनंद आहे. तीच हे नवं घर कर्जतमध्ये निसर्गरम्य ठिकाणी डोंगराच्या पायथ्याशी आहे. तिने नवीन घराचे फोटो शेअर करत आपला आनंद व्यक्त केला आहे.
प्राजक्ताने या फोटोंसोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘स्वप्न साकार…Happy owner of my dream “Farm House” (डोंगराच्या कुशीत, निसर्गाच्या सानिध्यात घर पाहिजे, एवढीच अट होती. अगदी मनासारखं घर मिळालं.) कर्जत.. नाव असणार आहे – “प्राजक्तकुंज”. (प्राजक्तत्रयी पुर्ण.) प्राजक्ताने शेवटी घरासाठी घेतलेल्या कर्जासंबंधी लिहिताना म्हटलंय, ‘खानदानातली सर्वात सुंदर property, खानदानातल्या.. सर्वात मोठ्या कर्जासहीत.. फेडू.. फक्त तुमचा आशिर्वाद राहू द्या’. सोबतच #हक्काचं_घर #प्राजक्तकुंज #गुरुकृपा असे हॅशटॅग वापरत तिने हि पोस्ट शेअर केली आहे.