बाबाजी लक्ष असू द्या!! ‘जुळून येती रेशीमगाठी’ मालिकेला 10 वर्ष पूर्ण..; प्राजक्ताने शेअर केली खास पोस्ट


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी हि कायम चर्चेत असते. एक उत्तम अभिनेत्री, निवेदिका आणि आता बिजनेस वुमन म्हणून प्राजक्ताकडे पहिले जाते. मालिका, चित्रपट आणि सिरीज अशा वेगवेगळ्या माध्यमातून प्राजक्ताने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. दरम्यान, प्राजक्ताची अत्यंत गाजलेली आणि लोकप्रिय ठरलेली ‘जुळून येती रेशीमगाठी’ हि मालिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. या मालिकेला आज तब्बल १० वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्त प्राजक्ताने आवर्जून एक पोस्ट शेअर केली आहे.

अभिनेत्री प्राजक्ता माली सोशल मीडियावर फार सक्रिय असते आणि त्यामुळे हि खास पोस्ट तिने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. प्राजक्ताने तिच्या कारकीर्दीच्या सुरुवातीला ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेतून मेघना हे पात्र साकारले होते. या मेघनाने प्राजक्ता प्रसिद्धी झोतात आणले असे अभिनेत्री स्वतः सांगते आहेत. या पोस्टमध्ये तिने ‘जुळून येती रेशीमगाठी’ मालिकेचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने लिहिलंय, ‘आज “जुळून येती रेशीमगाठी”ला सुरू होऊन १० वर्ष झाली. #timeflies . त्याच्या पुढच्या २ वर्षात माझं संपुर्ण आयूष्य बदलून गेलं होतं’.

‘आजही मालिकेतील एखादी झलक पाहताना मी हरवून जाते, गालावर आपसुक हसू उमटतं. या मालिकेशी निगडीत सगळ्या सगळ्यांचे मनापासून खूप आभार. #कृतज्ञता. आणि या मालिकेच्या प्रेक्षकांना तर खूप खूप प्रेम. आजही प्राजक्ता इतकच मेघना नाव मला आवडतं. (गुलजारांनी त्यांच्या मुलीचं नाव मेघना ठेवलंय, आणि हे नाव माझ्या पात्राला मिळालं म्हणून तेव्हाच मी खूप उड्या मारल्या होत्या.) आदित्य- मेघना जोडीवर तर तुम्ही अपार प्रेम केलत. त्या आभारासाठी तर शब्दच नाहीत. #आदित्य- मेघना महाराष्ट्रातल्या सगळ्या पोरींना त्यांच्या आयुष्यात आदित्य मिळो, हीच ह्या निमित्त प्रार्थना. #बाबाजी लक्ष असू द्या!!’ आजही प्राजक्ताच्या या मालिकेचे अनेक चाहते आहेत. तिच्या या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.