चंद्रकोर.. नथ.. हिरवा चुडा..!! मराठमोळ्या पेहरावात खुललं प्रार्थनाचं सौंदर्य; नेटकरी म्हणाले, ‘स्त्री ही एक कला…’


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वातील आघाडीची अभिनेत्री प्रार्थना बेहरे हि सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. विविध पेहरावातील फोटो, व्हिडीओ शेअर करून ती नेहमीच चाहत्यांचे लक्ष वेधून घेते. प्रार्थना मुळातच दिसायला इतकी सुंदर आहे कि तिने एखाद्या पेहरावातील लूक शेअर केला कि तो सोशल मीडियावर व्हायरल झाला म्हणून समजाचं. कधी वेस्टर्न तर कधी मराठमोळ्या पेहरावात प्रार्थना अनेकदा विविध फोटोशूट शेअर करते. आताही तिने असच एक मराठमोळ्या पेहरावातला कमालीचा लूक शेअर केला आहे.

अभिनेत्री प्रार्थना बेहरेने शेअर केलेल्या फोटोत ती प्रचंड सुंदर दिसते आहे. यात तिने अस्सल मराठमोळा लूक केला आहे. नारंगी हिरव्या रंगाची नववारी आणि त्यावर मराठमोळा साज… अशा पेहरावात प्रार्थनाचे सौंदर्य खुलून आले आहे. कपाळी चंद्रकोर, नाकात नथ, हातात हिरवा चुडा परिधान केल्याने प्रार्थना सौंदर्याची खाण वाटत आहे. शिवाय तिच्या अदा आणि डोळ्यातली चमक आपले पूर्ण लक्ष वेधून घेत आहे. प्रार्थनावरून नजर हटवणे फारच अवघड आहे. तिचा हा लूक सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

प्रार्थनाच्या या लूकवर अनेक चाहत्यांनी कमेंट करत तिच्या सौंदर्याची तारीफ केली आहे. एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहिले आहे, ‘स्त्री ही एक कला आहे तिला अनुभवण्यासाठी कलाकाराच्या हृदयाची गरज असते..’. आणखी एका नेटकऱ्याने लिहिले आहे कि, ‘वाँव ब्युटीफुल्ल’. तर आणखी एकाने लिहलंय, ‘शब्दांच्या पलीकडचे सौंदर्य’. आणखी एका युजरने लिहिले आहे कि, ‘हे सौंदर्याच्याही पलीकडचे आहे सगळे..’. याशिवाय अनेक नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर कमेंट करताना हार्ट ईमोजी, फायर ईमोजी शेअर केले आहे.