मनमोहिनी!! प्रार्थनाने परिधान केला मराठमोळा साज.. मन स्पर्शून गेला अभिनेत्रीचा मोहक अंदाज


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये प्रार्थना बेहरेचे नाव घेतले जाते. याचे कारण म्हणजे, प्रार्थनाने विविध धाटणीच्या भूमिका साकारत नेहमीच प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले आहे. कधी ग्लॅमरस, बोल्ड तर कधी सालस अन सोज्वळ भूमिकांमधून प्रार्थनाने आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे. मराठी तसेच हिंदी मालिका, मराठी चित्रपटांमधून प्रार्थनाने अनेक भूमिका साकारल्या आहेत. यातील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतील नेहा मात्र प्रेक्षकांच्या काळजात घर करून गेली. दरम्यान प्रार्थनाने सोशल मीडियावर मराठमोळा साज परिधान केलेल्या लूकमधील एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

अभिनेत्री प्रार्थना बेहरे हि सोशल मीडियावर फार सक्रिय असते. त्यामुळे अनेकदा ती स्वतःचे विविध लूकमधील फोटो आणि व्हिडीओ आपल्या चाहत्यांसह शेअर करताना दिसते. तिचे चाहतेदेखील तिच्या पोस्ट लाईक करताना दिसतात. नुकतीच प्रार्थनाने सोशल मिडीआयवर एक व्हिडीओ पोस्ट केली आहे. ज्यामध्ये तिने पारंपरिक मराठी साज परिधान केल्याचे दिसत आहे. कपाळावर चंद्रकोर, नाकात नथ, अंगावर नऊवारी साडी.. अशा पेहरावात प्रार्थना कमालीची सुंदर दिसते आहे. या व्हिडिओसोबत तिने शाहरुख खान आणि ऐश्वर्या राय अभिनित ‘देवदास’ चित्रपटातील लोकप्रिय ‘बैरी पिया’ गाणे बॅकग्राऊंडला जोडले आहे.

इतकेच काय तर, या व्हिडिओसोबत प्रार्थनाने कॅप्शनमध्ये गाण्याचे बोल लिहिले आहेत. ‘बैरी पिया बड़ा बेदर्दी… दिल का दर्द ना जाने, सौदाई.. हरजाई, ज़ुल्मी, राम दुहाई’, असे तिने कॅप्शन शेअर केले आहे. या व्हिडीओतीन प्रार्थनाच साज आणि अंदाज दोन्ही मनाला स्पर्शून जाणारा आहे. तिच्या डोळ्यातले भाव ती न बोलता बरंच काही बोलून जात आहेत आणि म्हणून तिचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. यावर तिचे चाहते आणि नेटकरी विविध कमेंट करत तिच्या सौंदर्याची आणि लूकची प्रशंसा करत आहेत.