हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रार्थना बेहरे हि मराठी सिने विश्वातील अत्यंत सुंदर, गोड आणि सोज्वळ अभिनेत्री आहे. मालिका, चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारत प्रार्थनाने कायम प्रेक्षकांवर आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. शिवाय प्रार्थना सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. यामुळे विविध लूकमधील फोटो, व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसते. दरम्यान प्रार्थनाने सोशल मीडियावर वजन आणि प्रेम याबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. जी चांगलीच चर्चेत आली आहे.
अभिनेत्री प्रार्थना बेहरेने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली होती. ज्यामध्ये प्रार्थनाने लिहिले होते कि, ‘जर तुम्हाला तुमचं वजन कमी करायचं असेल, तर त्यासाठी तुम्हाला व्यायाम करण्याची किंवा डाएट करण्याची गरज नाही. त्यासाठी फक्त एखाद्या चुकीच्या माणसाच्या प्रेमात पडा’. या स्टोरीसोबत तिने काही हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत. प्रार्थनाने शेअर केलेली हि स्टोरी सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली होती. वजन कमी करण्यासाठी प्रार्थनाने दिलेला सल्ला वाचून नेटकरी सुद्धा थक्क झाले आहेत.
अभिनेत्री प्रार्थना बेहरेच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर, अलीकडेच प्रार्थना झी मराठीच्या ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत अभिनेता श्रेयस तळपदेसोबत दिसली होती. या मालिकेतील तिने साकारलेले नेहा हे पात्र तुफान गाजले. मालिका संपली मात्र प्रार्थनाने साकारलेली नेहा प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली. यानंतर आता प्रार्थना एका चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर प्रार्थना बेहरे, अभिनेता कुशल बद्रिके आणि दिग्दर्शक संजय जाधव यांचे कॉमिक रिल्स देखील व्हायरल होत आहेत.