Prasad – Amruta Mehendi | झाली लगीनघाई! अमृता आणि प्रसादने काढली एकमेकांच्या नावाची मेहेंदी, प्रसादने लिहिला खास संदेश


Prasad – Amruta Mehendi सध्या सर्वत्र लगीनसराई चालू आहे. अशातच मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध जोडपे बिग बॉस मराठी फिल्म अमृता देशमुखांनी प्रसाद जवादे हे लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. अमृता आणि प्रसाद दोघांच्या घरी लग्नाची खूप चांगली तयारी चालू झाली आहे. लग्नाच्या आधीच्या विधींना देखील सुरुवात झालेली आहे. नुकतेच प्रसाद आणि अमृताचा मेहंदीचा कार्यक्रम देखील पार पडला आहे. आणि याची काही फोटो अमृताने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे.

तिच्या मेहंदी फंक्शनसाठी अमृता आणि प्रसादने खूप छान लुक केला आहे. तिने पिवळ्या रंगाचा लेहंगा घातलेला आहे. तसेच फुलांची ज्वेलरी देखील घातलेली आहे. या लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. अमृता आणि प्रसाद या दोघांनी मेहंदी काढलेली आहे. अमृताच्या हातावर तिने बिग बॉसची थीम वापरून मेहंदी काढलेली आहे. तर प्रसादने त्याच्या नावावर अमृताच्या नावाने मेहंदी काढली आहे. प्रसादने त्याच्या हातावर अमृतमय झालो असे लिहिले आहे.

हेही वाचा – ‘प्रत्येक बहिणीच्या पाठीशी…’; आनंद दिघेंचा उल्लेख करणारी प्रसाद ओकची ‘ती’ पोस्ट चर्चेत

प्रसाद आणि अमृताचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे अनेकजण त्यांना शुभेच्छा देखील देत आहेत.

अमृता आणि प्रसादची भेट ही बिग बॉस मराठीच्या घरात झाली होती. त्यानंतरच त्या दोघांमध्ये खूप चांगली मैत्री झाली. आणि त्यानंतर बाहेर आल्यानंतर त्या दोघांनी एकमेकांना प्रेमाची कबुली दिली. त्याचप्रमाणे साखरपुडा देखील झाला. आता 18 नोव्हेंबरला प्रसाद आणि अमृता दोघेही लग्न बंधनात अडकणार आहेत.