नवरा असावा असा!! लग्नानंतर प्रसादने थाटात साजरा केला अमृताचा पहिला सण; खास लूकने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| बिग बॉस मराठीच्या माध्यमातून तयार झालेली जोडी अभिनेत्री अमृता देशमुख आणि अभिनेता प्रसाद जवादे हे नुकतेच लग्नबंधनात अडकले. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ अजूनही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे फोटो, व्हिडीओ जुने होण्याआधीच प्रसाद- अमृताच्या लग्नानंतरचा पहिला सण मकर संक्रांत आली आणि दोघांनी मिळून अत्यंत हटके पद्धतीने ती साजरी केली. या सणानिमित्त दोघांनी केलेला पेहराव आणि त्यातील फोटो साध्य सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.

लग्नानंतरही सातत्याने चर्चेत राहणारं हे कपल नुकत्याच झालेल्या मकर संक्रांतीमुळे पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. लग्नानंतर अमृताची हि पहिलीच मकर संक्रांत होती आणि त्यामुळे प्रसादने हि संक्रांत मोठ्या उत्साहात साजरी केली. प्रथेप्रमाणे लग्नानंतरच्या पहिल्या मकर संक्रांतीला अमृता आणि प्रसाद दोघांनीही काळ्या रंगाचे कपडे परिधान केले होते. सोबत हलव्याचे दागिने परिधान केल्याने त्यांचा लूक आणखीच लक्षवेधी ठरला.

अभिनेत्री अमृता देशमुख- जवादेने तिच्या पहिल्या मकर संक्रांतीचे फोटो अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अमृता आणि प्रसादची जोडी कमाल दिसते आहे. अमृताने परिधान केलेल्या काळ्या रंगाच्या साडीवर पांढऱ्या रंगाची फुलं आणि प्रसादच्या कुर्त्यावर पतंगांची नक्षी दिसते आहे. दोघांच्याही लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले असून या फोटोंवर नेटकरी लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करताना दिसत आहेत.