कसलं भारी!! प्रसाद- अमृताचा रिव्हर्स कांदेपोह्यांचा कार्यक्रम; नात्यांचा गोडवा ‘असा’ वाढवला


हॅलो बॉलिवूड ओनलाईन। ‘बिग बॉस मराठी सीजन ४’च्या घरात अभिनेता प्रसाद जवादे आणि अभिनेत्री अमृता देशमुख यांचं असं काही सूत जुळलं कि आता त्यांनी एकमेकांना साता जन्माचे जोडीदार म्हणून निवडले आहे. अलीकडेच प्रसाद आणि अमृता यांनी गुपचूप साखरपुडा उरकला. त्यानंतर सोशल मीडियावर दोघांच्याही साखरपुड्यानंतरचे रोमँटिक फोटोशुट व्हायरल झाले होते. दरम्यान अमृताने सोशल मीडियावर त्यांच्या कांदे पोहे कार्यक्रमाचा व्हिडीओ शेअर केला आहे. जो रिव्हर्स कांदे पोहे कार्यक्रम ठरला आहे.

प्रसादचे कुटुंबीय अमृताला बघण्यासाठी तिच्या घरी गेले होते. दरम्यान किचनमध्ये प्रसाद आणि अमृता यांचा एक वेगळाच कांदे पोहेचा कार्यक्रम सुरु होता. अमृताने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओत प्रसाद किचनमध्ये चक्क कॉफी बनवताना दिसतोय. यावेळी तो अमृताला म्हणतोय, ‘की तु चहा नीट बनवत नाही, त्यामुळे मी कॉफी बनवतो. आपला बघण्याचा कार्यक्रम त्यामुळे चांगला होईल’. इतकेच काय तर या व्हिडिओत तो अमृताला आय लव्ह यू सुद्धा म्हणताना दिसतोय.

या व्हिडिओसोबत अमृताने कॅप्शनमध्ये लिहिलंय, ‘.. जेव्हा प्रसाद जवादे आणि फॅमिली मला “बघायला” आले..! नंतर मी माझ्या नाजूक हातांनी सगळ्यांना चहा दिला.. पण किचनमध्ये ज्या गोष्टी घडल्या त्या किचनमध्येच राहतील.. Jokes apart… फक्त प्रसादच नाही तर त्याच्या फॅमिलीने सुद्धा हा रिव्हर्स चहा – पोहे कार्यक्रमाचा आनंद घेतला! आशा आहे की, आम्ही केलेली ही उलट गोष्ट प्रत्येक सुनेसाठी सामान्य होऊन जाईल..’. सध्या सोशल मीडियावर प्रसाद आणि अमृता हे कपल चांगलाच ट्रेंडिंगमध्ये आहे. हि लोकप्रिय जोडी येत्या १८ नोव्हेंबर २०२३ रोजी लग्नबंधनात अडकणार आहे.