Prasad Jawade | लग्नानंतर प्रसाद जवादेची नवीन मालिकेत ड्रमदार एंट्री, प्रोमो व्हायरला


Prasad Jawade | बिग बॉस या शोमुळे अनेक कलाकार पुढे आले आहेत. आणि चर्चेचा विषय बनले आहेत .त्यातीलच एक अभिनेता म्हणजे अभिनेता प्रसाद जवादे. प्रसादने 18 नोव्हेंबर रोजी अगदी मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये बिग बॉस फेम अभिनेत्री अमृता देशमुख सोबत लग्न केलं. त्यामुळे सध्या हे जोडपे चांगले चर्चेचा विषय बनत आहे. परंतु आता लग्नाला काही दिवस झाल्यानंतरच प्रसाद आणि अमृता आणि पुन्हा एकदा त्यांच्या कामावरत फोकस केलेले आहे. प्रसाद लवकरच एका लोकप्रिय मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हेही वाचा – ‘बाजार उठवीन तुमचा..’; ‘शुभविवाह’ मालिकेत निळू फुलेंच्या लेकीची दमदार एंट्री

सध्या अमृताचे नियम आणि अटी लागू हे नाटक जोरदार चालू आहे. तर दुसरीकडे प्रसाद देखील मालिकांकडे वळालेला आहे. प्रसाद लवकरच सन मराठीवरील एका मालिकेमध्ये प्रेक्षकांना पुन्हा पाहायला मिळणार आहे.

लग्नाच्या काही दिवस आधीच प्रसादने कलर्स मराठीवरील काव्यांजली या मालिकेतून एक्झिट घेतली तर त्याच्या जागी आता आदिश वैद्य काम करत आहे. आता प्रसाद सन मराठीवरील सावली होईल सुखाची या मालिकेत झळकणार आहे. आणि नुकताच या मालिकेचा प्रमुख देखील समोर आला आहे. या मालिकेत प्रसाद एका महत्त्वाच्या भूमिकेत असणार आहे.

प्रसादला पुन्हा एकदा मालिकांमध्ये पाहण्यासाठी त्याचे चाहते खूप उत्सुक आहेत. आणि सगळेजण आता या मालिकेची आतुरतेने वाट पाहत आहेत.