हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रसाद खांडेकर दिग्दर्शित ‘एकदा येऊन तर बघा’ हा चित्रपट आज थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाला चित्रपटगृह मिळण्यात अडचणी येत असल्याची खंत प्रसादने व्यक्त केली होती. याबाबत विधान परिषदेचे सभागृह नेते प्रवीण दरेकर यांनी हा मुद्दा परिषदेत मांडला आणि यावर आता प्रसादने प्रतिक्रिया दिली आहे. विधान परिषदेतील एक व्हिडीओ शेअर करत त्याने दरेकरांचे आभार मानले आहेत.
यात प्रसादने लिहिलंय, ‘स्ट्रगल इथले संपत नाही…… “एकदा येऊन तर बघा” सिनेमा ८ डिसेंबर पासून सर्वत्र प्रदर्शित होतोय, झालं असं की आत्तापर्यंत बऱ्याचदा अस झालंय की मराठी सिनेमांना थिएटर्स मिळताना खुप मारामार करावी लागते … ज्या सिनेमाच्या पाठीशी मोठे बॅनर आणि मोठे प्रोडक्शन हाऊस असतात त्यांच्या नशिबात आरामात थिएटर्स मिळतात …. पण हा आत्तापर्यंत चा अनुभव फक्त वाचून आणि ऐकून होतो पहिल्यांदा हा अनुभव आत्ता मला माझ्या पहिल्याच सिनेमाच्या बाबतीत सुद्धा आला. मुळात सगळेच मराठी सिनेमे थिएटरमध्ये चालावेत म्हणून आधीच मी इतर दोन मराठी सिनेमांची रिलीज डेट अनाऊन्स झाल्यामुळे मी माझ्या सिनेमाची रिलीज डेट दोनदा पुढे ढकलून दीड महिने आधीच मी 24 नोव्हेंबर ही तारीख अनाऊन्स केली की जेणेकरुन त्यावेळी जर कोणी रिलीज करणार असतील तर मराठी सिनेमांची आपापसात स्पर्धा नको व्हायला…..’.
‘तरीही एका मोठ्या मराठी सिनेमाची त्या दिवशी रिलीज डेट अनाऊन्स झाली …. आता ह्या सिनेमातील ही सगळेच मित्र मैत्रिणी असल्या कारणाने आणि पुन्हा एकाच दिवशी रिलीज करून पुन्हा स्पर्धा नको म्हणून डिस्ट्रिब्युटर सोबत चर्चा करून पूर्ण पब्लिसिटी झालेली असताना सुद्धा सिनेमा अजून दोन आठवडे पुढे ढकलला आणि 8 डिसेंम्बरला रिलीज करण्याच ठरवलं …. 8 डिसेंम्बर ला थिएटर्स आणि स्क्रिनस नक्की मिळतील अस आश्वासन मिळालं परंतु आता शुक्रवारी फिल्म रिलीज असताना बुधवार रात्र आली तरी सिनेमाला थिएटर आणि स्क्रिनस मिळत नव्हते ..बरं जे मिळाले ते हाताच्या बोटावर मोजण्याइतपत आणि छोटे स्क्रिन त्यातही सकाळ आणि दुपारचे शोज मिळत होते ……सोशल मीडिया वरून प्रेक्षक थेट विचारत होते की सिनेमा आमच्या भागातल्या थिएटर्स ना दिसत नाहीये’.
‘मी बोरिवली मध्ये राहायला …. माझ्या स्वतःच्या घरच्यांना सिनेमा पाहायचा आहे पण जवळच्या थिएटरमध्ये शोच नाही आणि मग हे घडलं.. कलाकार असल्यामुळे सगळ्याच पक्षाच्या सगळ्याच लोकांसोबत खुप छान संबंध आहेत …. आज सकाळी मा. प्रविण भाऊ दरेकर ह्यांच्यासोबत बोलताना मी त्यांना झालेला प्रकार सांगितला आणि त्यांनी तो तात्काळ अधिवेशनात मांडला आणि चक्र फिरली…. प्रवीण भाऊ दरेकर ह्यांचे खरंच मनापासून आभार …. मा.मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, मा.उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, मा.सुधीर मुनगंटीवार साहेब ह्यांचेसुद्धा मनःपूर्वक आभार… आणि माझा वर्गमित्र सागर बागुल तुला ही थँक्स मित्रा… हे फक्त माझ्याच सिनेमाच्या बाबतीतील म्हणणं नाहीये तर सगळ्याच मराठी सिनेमांना योग्य न्याय मिळाला पाहिजे’.