हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वातून एकत्र आलेले प्रसाद आणि अमृता अखेर लग्नबंधनात अडकले आहेत. ‘बिग बॉस मराठी’च्या घाट सुरु झालेली हि लव्हस्टोरी शेवटी लग्नमंडपापर्यंत पोहोचलीच. अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे यांच्या लग्नाचे फोटो तसेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यांच्या लुकपासून ते मंगळसूत्राच्या डिझाईनपर्यंत सगळंच चाहत्यांमध्ये चर्चेत आहे. दरम्यान अमृताचं जसं मंगळसूत्र चर्चेत आहे तसंच प्रसादच्या गळ्यातील लॉकेटदेखील सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
प्रसाद आणि अमृताच्या लग्नाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अगदी ग्रहमख, मेहंदी, हळद, संगीत आणि वरमाला ते सप्तपदी पर्यंत सर्व विधींच्या फोटो, व्हिडीओंची सोशल मीडियावर चर्चा आहे. अशातच आता एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये प्रसाद त्याच्या गळयात एका चैनमध्ये काहीतरी बांधताना दिसतो आहे. यामध्ये एक लॉकेट आहे. त्या पेंडन्टवर अमृताचं नाव लिहिलेलं दिसत आहे. प्रसादने हे लॉकेट त्याच्या गळ्यात घातल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर आलेली स्माईल पाहण्यासारखी आहे.
हे लॉकेट अमृताच्या बाबांनी त्याच्या हातात दिले. देशमुखांनी हे लॉकेट खास जावई प्रसादसाठी बनवलं आहे. जसं अमृताने प्रसादच्या नावाचं मंगळसूत्र तिच्या गळ्यात बांधलं अगदी तसंच प्रसादने अमृताच्या नावाचं लॉकेट गळ्यात बांधलं आहे. अमृता आणि प्रसादमधील हे प्रेम पाहून नेटकरी अक्षरशः भारावले आहेत. या व्हिडीओ आणि फोटोंवर नेटकरी कमेंट करत या लाडक्या जोडीवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. एका नेटकऱ्याने कमेंट करत म्हटले आहे कि, ‘नवरा असावा तर असा’. तर आणखी एकाने म्हटलं, ‘अमृतमय जाहलोचा खरा अर्थ आज समजला’.