‘तू माझ्या आयुष्यात आल्यापासून…’; प्रथमेश परबच्या वाढदिवसानिमित्त गर्लफ्रेंडची रोमँटिक पोस्ट


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘टाईमपास’ चित्रपटातील दगडू आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. हि भूमिका साकारणारा अभिनेता प्रथमेश परब आज घराघरांत लोकप्रिय झाला आहे. या चित्रपटाने प्रथमेशला ‘दगडू’ ही वेगळी ओळख दिली आणि प्रसिद्धीझोतात आणलं. शिवाय प्रथमेशचा हटके अंदाज कायम चर्चेत असतो. अनेक विनोदी चित्रपटांमध्ये त्याने कमाल भूमिका साकारल्या आहेत. आज त्याचा चाहता वर्ग फार मोठा आहे. मध्यंतरी प्रथमच त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला होता. आज पुन्हा याच कारणामुळे तो चर्चेत आला आहे.

काही महिन्यांपूर्वी अभिनेता प्रथमेश परबने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत त्याच्या प्रेमाची कबुली दिली होती. गतवर्षी दिवाळीनिमित्त त्याने गर्लफ्रेंडसोबत एक खास फोटोशूट केलं होते. जे फार चर्चेत आलं होतं. प्रथमेशच्या गर्लफ्रेंडचं नाव क्षितिजा घोसाळकर असून दोघांच्या अफेअरच्या चर्चा चांगल्याच रंगल्या. यंदा व्हॅलेंटाईन डेदिवशी प्रथमेशने क्षितिजासोबतच्या नात्याची अधिकृत घोषणा केली. अशातच आज प्रथमेशचा वाढदिवस आहे आणि या दिवसाचे औचित्य साधून क्षितिजाने एक रोमँटिक पोस्ट शेअर केली आहे.

या पोस्टमध्ये क्षितिजाने लिहिलंय कि, ‘हॅलो प्रथमेश… माझ्या आयुष्यातील तुझं स्थान खरंच खूप महत्त्वाचं आहे. तू माझ्या आयुष्यात आल्यापासून प्रत्येक गोष्ट सुंदर झाली. मी खरंच नशीबवान आहे म्हणून मला तुझ्यासारखा काळजी करणारा, गोड जोडीदार मिळाला. प्रथमेश तू खरंच भारी आहेस! आपल्यामधील हे घट्ट नातं असंच कायम राहावं एवढीच इच्छा… तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!! भविष्यात येणारे वाढदिवस सुद्धा असेच तुझ्याबरोबर साजरे करण्यासाठी मी उत्सुक आहे…. सगळ्यात महत्त्वाचं आय लव्ह यू प्रथमेश’. क्षितिजाची हि पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.