सनई चौघडे वाजणार!! ‘या’ दिवशी प्रथमेश परब लग्नगाठ बांधणार; डिजिटल पत्रिकेने वेधलं लक्ष


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘टाईमपास’ या अत्यंत गाजलेल्या चित्रपटातून दगडू प्रेक्षकांच्या भेटीला आला. या भूमिके प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आणि हि भूमिका साकारून अभिनेता प्रथमेश परबने सिनेविश्वात स्वतःसाठी हक्काची जागा निर्माण केली. प्रथमेश परब केवळ त्याच्या अभिनयामुळे नव्हे तर त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत येत असतो आणि आता लवकरच तो लग्न बंधनात अडकणार आहे. काही महिन्यांपूर्वी प्रथमेशने त्याच्या लेडी लव्हची अधिकृत ओळख करून दिली आणि त्यानंतर लग्न करणार असल्याची घोषणा केली होती. यानंतर आता त्याच्या लग्नाची तारीख समोर आली आहे.

अभिनेता प्रथमेश परब त्याची गर्लफ्रेंड क्षितिजा घोसाळकरसोबत लग्न बंधनात अडकणार आहे. गेल्या वर्षी व्हॅलेंटाईन डेला त्याने प्रेमाची कबुली दिली आणि यंदा तो व्हॅलेंटाईन डेदिवशी क्षितिजासोबत साखरपुडा करणार आहे. त्यानंतर बरोबर १० दिवसांनी या दोघांचं लग्न होणार आहे. नुकतीच सोशल मीडियावर त्यांनी साखरपुडा आणि लग्नाची तारीख जाहीर केली आहे. त्यानुसार येत्या १४ फेब्रुवारीला दोघांचा साखरपुडा आणि त्यानंतर १० दिवसांनी २४ फेब्रुवारीला त्यांचं लग्न होणार असल्याचे समोर आले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून प्रथमेश आणि क्षितीजाच्या केळवणाचे बरेच फोटो, व्हिडीओ व्हायरल झाले होते. अखेर आता लग्नाला फक्त १ महिना उरल्याचे समोर आले आहे. लग्नाची तारीख सांगताना दोघांनी शेअर केलेला फोटो फारच सुंदर आहे. डिजिटल कार्डच्या माध्यमातून त्यांनी आपल्या आयुष्यातील अत्यंत महत्वाच्या दिवसाबद्दल नेटकऱ्यांना माहिती दिली आहे. आता हे लव्हबर्ड्स कायमचे एकत्र येण्यासाठी सज्ज झाले आहेत. सोशल मीडियावर प्रथमेशचे चाहते त्याच्यावर आणि क्षितिजावर शुभेच्छांचा वर्षाव करताना दिसत आहेत.