Prathmesh – Mugdha | ‘जरा रोमँटिक असल्यासारखा दिस…’ युजर्सच्या कमेंटवर प्रथमेशने केला पलटवार, म्हणाला…


Prathmesh – Mugdha | सारेगमप लिटिल चॅम्प्स या घराघरातून पोहोचलेली जोडी प्रथमेश लगाटे आणि मुग्धा हे दोघेही लवकरच लग्न बंधनात अडकणार आहेत. काही महिन्यांपूर्वीच मुग्धा आणि प्रथमेशने त्यांच्या प्रेमाची कबुली दिली. त्यानंतर आता त्यांच्या लग्नाची तयारी जोरदार सुरू झालेली आहे.

काही दिवसांपूर्वी त्यांच्या केळवण्याचा कार्यक्रम पार पडला आहे आणि त्यांचा व्याही भोजन देखील झालेले आहे. याचे फोटो मुग्धाने सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले होते. मात्र या फोटोमध्ये प्रथमेशने दिलेल्या पोस्टमुळे त्याला रोल केले जात आहे.

त्यांच्या या फोटोवर एकाने कमेंट केली आहे की, ” मस्त फोटो आहे. फक्त प्रथमेशाला सांग पुढच्या वेळी रोमँटिक असल्यासारखा दिस. कारण तो सत्नारायणाच्या पूजेला आलेल्या भटजी सारखा उभा राहू नको. बाकी खूप छान.”

ही कमेंट पाहून प्रथमेशने देखील उत्तर दिले आहे. तो म्हणाला की, “अण्णा व्याही भोजन ही आपली परंपरा आहे. ट्रेडिशनल गोष्टीत कुठे रोमान्स घुसवता. एवढं कन्फ्युजन” प्रथेमशने केलेल्या या कमेंटला अनेकजण सपोर्ट देखील करत आहे.

लवकरच मुग्धा आणि प्रथमेश लग्न करणार आहे. त्याच्या सगळ्या कार्यक्रमाला सुरुवात देखील झाली आहे. त्यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत असतात.