हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी कला विश्वात लेखक, दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेता म्हणून कायम आपली भूमिका अव्वल साकारणाऱ्या प्रवीण तरडे यांचा आज वाढदिवस. आजतागायत त्यांनी मालिका, नाटक, चित्रपट अशा वेगवेगळ्या माध्यमातून प्रेक्षकांचे वेगवेगळी जबाबदारी पार पाडत मनोरंजन केले आहे. मराठी, हिंदी, साऊथ अशा विविध सिनेसृष्टीत त्यांनी काम केल्यामुळे त्यांचा चाहता वर्ग तितका मोठा आहे. आज त्यांचा वाढदिवस असल्यामुळे सोशल मीडियावर शुभेच्छांचा अक्षरशः पाऊस पडतो आहे. अशातच त्यांच्या पत्नीने शेअर केलेली पोस्ट व्हायरल झाली आहे.
अभिनेता प्रवीण तरडे यांना वाढदिवसानिमित्त सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येकजण शुभेच्छा देत आहे. कुणी पोस्टर शेअर करत, तर कुणी व्हिडीओ, कुणी त्यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा देत आपल्या भावना व्यक्त करत आहेत. दरम्यान प्रवीण यांची पत्नी स्नेहल प्रवीण तरडेने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक खास व्हिडीओ पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये स्नेहल आणि प्रवीण एकत्र गप्पा मारताना दिसत आहेत. यावेळी दोघांचेही चेहरे चांगलेच फुललेले आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर फार चर्चेत आला आहे.
स्नेहलने हा व्हिडीओ शेअर करून आपल्या पतीला म्हणजेच प्रवीण तरडे याना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या व्हिडिओमागे तिने ‘यारियां २’ या चित्रपटातील ‘ऊंची ऊंची दीवारे’ हे गाणं जोडलं आहे. तसेच हा व्हिडीओ शेअर करताना स्नेहलने कॅप्शनमध्ये लिहीलं आहे कि, ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रियवरा!! धकाधकीच्या जीवनात, कामाच्या धबडग्यात प्रेमाचे असे गोड, निवांत क्षण तुला आयुष्यभर लाभोत या शुभ कामना!’. या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट करत प्रवीण तरडे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. सोबतच या जोडीवर प्रेमाचा वर्षाव केला आहे.