मुक्ता- सागरचा मधुचंद्र!! वेटरमुळे झाला मोठा गोंधळ; औषधाऐवजी ‘ते’ आणून दिलं…


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘प्रेमाची गोष्ट’ सध्या अतिशय भारी ट्रॅकवर सुरु आहे. त्यामुळे या मालिकेचा टीआरपी दिवसेंदिवस काहीच्या काही वाढताना दिसतोय. नुकताच मुक्ता आणि सागर यांचा विवाह सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडला. सावनीने विघ्न आणायचा प्रयत्न केला मात्र मुक्ताच्या हुशारीने संकट टळलं. आता सागर आणि मुक्त लग्नबंधनात अडकले असून खऱ्या अर्थाने त्यांची ‘प्रेमाची गोष्ट’ सुरु होताना दिसणार आहे. सईसाठी केलेल्या या लग्नामुळे मुक्ता आणि सागर यांच्यातील दुरावा कमी होईल असे वाटताना आता दोघांना भांडायला नवं कारण मिळालं आहे.

सईच्या प्रेमाखातर मुक्ता आणि सागर लग्नबंधनात अडकले. पण नवरा बायको म्हणून तूर्तास तरी ते काही एकमेकांना सहन करू शकत नाहीत. येत्या काळात त्यांच्यातील अंतर कमी कसं होईल..? ते जवळ कसे येतील..? त्यांना एकमेकांविषयी प्रेम कसं निर्माण होईल..? हे पहायला मिळणार आहे. पण नुकताच त्यांच्या हनिमून मध्ये मोठा गोंधळ झाल्याचे पहायला मिळत आहे. त्याच झालं असं कि, गोखले कुटुंबाच्या रितीप्रमाणे मुक्ताची पाठवणी झाल्यानंतर दोन्ही कुटुंब एकत्र जेवताना दिसणार आहे. यावेळी गोखले कुटुंबाच्या पद्धतीने खास मेजवानी रंगली.

गोखले कुटुंबाने त्यांच्या पद्धतीनुसार जावयाला गोडधोड खाऊ घातलं. यावेळी मयुरेश आणि मयुरी सागरला भरपूर बासुंदी खाऊ घालतात. पण सागरला दुधाची अ‍ॅलर्जी आहे, हे कोणालाच माहित नसतं. कसाबसा सागर मुयरेश- मयुरीला थांबवतो. पण जे व्हायचं ते होतंच. सागरला हनिमून दरम्यान जुलाब होऊ लागतात. ज्यामुळे तो वेटरला औषध आणण्यासाठी सांगतो. दरम्यान मुक्ता खोलीत येते आणि नेमका तेव्हा वेटर औषधांऐवजी तिच्या हातात कंडोम आणून देतो. ज्यामुळे मुक्ताचा गैरसमज होतो. ती सागरला कंडोमविषयी विचारते पण सागरला ते समजत नाही आणि तो औषधाविषयी बोलतो. आता हा गैरसमज ह्या नात्याला काय वळण देणार हे पहायला मजा येणार इतकं नक्की.