‘कुतुब मिनार.. लोधी गार्डन.. मेट्रोतून प्रवास.. ‘; प्रिया मराठे आणि शंतनू मोघेची दिल्ली ट्रिप


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मालिका विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठे ही तिच्या निगेटिव्ह भूमिकांमुळे प्रचंड लोकप्रिय आहे. नकारात्मक खलनायिकेच्या भूमिका साकारून देखील प्रियाने स्वतःच्या अभिनयाच्या जोरावर एक वेगळा आणि भव्य असा चाहता वर्ग निर्माण केला आहे. अशी ही अभिनेत्री सोशल मीडियावर कायम चर्चेत असते आणि या माध्यमातून ती प्रेक्षकांच्या संपर्कात राहताना दिसते. सध्या प्रिया तिचा पती आणि अभिनेता शंतनू मोघे सोबत सुट्ट्या एन्जॉय करते आहे.

अभिनेत्री प्रिया मराठेने नुकतीच अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती आणि तिचा नवरा अभिनेता शंतनू मोघे दिसत आहेत. यामध्ये प्रिया आणि शंतनू दिल्लीची सफर करताना दिसत आहेत. या फोटोत प्रिया आणि शंतनू यांनी कुतूब मिनारला भेट दिल्याचे समजत आहे. या तिने कॅप्शनमध्ये लिहिलंय, ‘कुतूब मिनार… आम्हाला फिरायला खूप आवडते. सुट्टीच्या दिवशी आम्ही फिरायला गेलो तर दिवसभर हॉटेलमध्ये कधीच थांबत नाही. आम्ही बॅग भरतो आणि ते संपूर्ण शहर फिरतो. दिल्लीतील पहिला दिवस आणि पहिले ठिकाण भव्य प्राचीन वास्तू – कुतुबमिनार.. भारताच्या गौरवशाली भूतकाळाची आठवण करून देणारा..’.

या व्हिडिओसोबत प्रियाने आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती आणि शंतनू लोकल वाहतूक साधनांचा वापर करताना दिसत आहेत. तसेच त्यांनी लोधी गार्डनला देखील भेट दिल्याचे स्पष्ट होत आहे. या व्हिडिओसोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिलंय, ‘आम्हाला प्रवास करताना स्थानिक वाहतूक देखील आवडते.. आम्ही अनेक ठिकाणी दिल्ली मेट्रो नेली.. (दिल्ली मेट्रो अतिशय सोयीस्कर आहे आणि चांगली जोडलेली आहे).. आम्ही सुंदर लोधी गार्डनला गेलो.. हे ऐतिहासिक महत्त्व असलेले खूप मोठे आणि सुस्थितीत आहे’.