Priya Bapat | ‘मला आता वीट आला आहे…,’ प्रिया बापटने दिवाळीबाबत केली ‘ही’ खंत व्यक्त


Priya Bapat |सध्या दिवाळी चालू आहे आणि या दिवाळीमध्ये रोषणाई आकाश कंदील, दिवे या गोष्टी सर्रास पाहायला मिळतात. त्यात पण दिव्यांची आरास आणि आकाश कंदील हे या सणाचे विशेष आकर्षण असते. बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे कंदील मिळतात. परंतु अनेकजण घरी देखील हे कंदील बनवत असतात. बरेच लोक असे आहे जे विकत कंदील घेतात. बाजारात सध्या विविध प्रकारचे रंगीबेरंगी कंदील उपलब्ध आहे. आता याबाबतच अभिनेत्री प्रिया बापट शेअर केली आहे.

प्रिया बापटची पोस्ट | Priya Bapat

प्रिया बापट दरवर्षीच तिच्या कुटुंबासोबत खूप चांगल्या पद्धतीने दिवाळी साजरी करते. आणि तिचे फोटो देखील सोशल मीडियावर शेअर करत असते. परंतु प्रियाने शेअर केलेल्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतलेले आहे. तिने आकाश कंदीलाबाबत ही पोस्ट केली आहे. या तिने लिहिले आहे की, “प्लास्टिकचे कंदील बघून वीट आला आहे. आपले पारंपारिक कागदाचे कंदील सहजासहजी मिळतच नाही ते अगदी मोजक्या काही ठिकाणी मिळतात.”

Priya Bapat

प्रियाने शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. यावर तिने प्रश्न विचारला आहे की, तुम्हाला कोणता कंदील आवडतो यावर प्रियाने उत्तर दिले की पारंपारिक कंदील किंवा इतर कोणताही. यावर पारंपारिक कंदील या पर्यायाला जवळपास 91 टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे.

हेही वाचा- Amruta Khanvilkar | राज ठाकरे यांनी अमृता खानविलकरला पाठवले दिवाळीचे गिफ्ट, अभिनेत्रीने मानले ठाकरे परिवाराचे आभार

प्रिया बापटचे काम

प्रियाने अनेक चित्रपट मालिका आणि वेबसिरीजमध्ये काम करून तिची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तसेच ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ या वेबसिरीजमुळे प्रिया संपूर्ण देशभरात लोकप्रिय झाली आहे. या वेब सिरीजमध्ये तिच्या पात्राचे नाव पौर्णिमा गायकवाड हे होते. सध्या प्रिया ‘जर तरची गोष्ट’ या नाटकात काम करत आहे. या नाटकाच्या निमित्ताने प्रिया आणि उमेशची जोडी तब्बल दहा वर्षांनी प्रेक्षकांना रंगभूमीवर पाहायला मिळत आहे.