उमेश- प्रियाचा रोमँटिक लिपलॉक; सोशल मीडियावर फोटो व्हायरल


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय जोडपे अभिनेता उमेश कामत आणि प्रिया बापट कायम चर्चेत असतात. मराठी नाटक, मालिका, चित्रपट, वेब सिरीज अशा विविध माध्यमातून उमेश आणि प्रिया यांनी कायम प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. दोघांचाही वैयक्तिक चाहता वर्ग फार मोठा असून या जोडीचा चाहता वर्ग देखील मोठ्या संख्येत आहे. नुकताच त्यांच्या लग्नाचा वाढदिवस झाला आणि या निमित्ताने प्रियाने सोशल मीडियावर त्यांचे काही रोमँटिक फोटो पोस्ट केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.

उमेश कामत आणि प्रिया बापट हे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडपं असून चाहते कायम त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करत असतात. दोघेही सोशल मीडियावर फार सक्रिय असून कायम एकमेकांसोबतचे फोटो तसेच व्हिडीओ शेअर करत असतात. अशातच प्रियाने लग्नाच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे काही रोमँटिक फोटो पोस्ट केले आहेत. सोबत कॅप्शनमध्ये उमेशला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. प्रिया आणि उमेशच्या लग्नाला एकूण १२ वर्षे पूर्ण झाली असून ते दोघे गेली १८ वर्ष एकमेकांच्या प्रेमात आहेत. याबाबत प्रियाने लिहिलं, ‘१८ वर्षे प्रेमात आणि १२ वर्षांचा संसार!’.

उमेश प्रियाचे हे फोटो ऑस्ट्रेलियातील ब्लू माउंटनमधील आहेत. ज्यामध्ये एका फोटोत उमेश आणि प्रिया एकमेकांना लिपकिस करताना दिसत आहेत. तर दुसऱ्या फोटोत ते एकमेकांना मिठीत घेऊन अत्यंत क्यूट पोज देताना दिसत आहेत. माहितीनुसार, उमेश आणि प्रिया सध्या ऑस्ट्रेलियामध्ये आहेत. त्यांच्या ‘जर तर ची गोष्ट’ या नाटकाच्या प्रयोगासाठी ते परदेशात गेल्याचे समजत आहे. दरम्यान, आज लग्नाचा वाढदिवसानिमित्त प्रियाने आवर्जून हे रोमँटिक फोटो शेअर केले आहेत. जे सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.