Priya Berde | आपल्या अभिनयाने 90 च्या दशकात प्रेक्षकांच्या मनाला भुरळ घालणाऱ्या अभिनेत्री म्हणजे अभिनेत्री प्रिया बेर्डे. मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक भूमिका साकारून त्यांनी त्यांची एक वेगळी जागा निर्माण केली आहे. सध्या नाटक, चित्रपट आणि राजकारण अशा सगळ्या गोष्टींमध्ये त्या सक्रिय असतात. नुकतेच त्यांनी एका माध्यमांना मुलाखती दिल्या. त्यावेळी त्यांनी त्यांच्या करिअर तसेच खाजगी आयुष्याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या. त्याचप्रमाणे कठीण काळामध्ये स्वामींचा साक्षात्कार झाल्याचे देखील त्यांनी सांगितले.
काय म्हणाल्या प्रिया बेर्डे | Priya Berde
माध्यमांना दिलेल्या या मुलाखतीमध्ये त्या म्हणाल्या की, “मधल्या काही काळामध्ये म्हणजेच 13-14 वर्षांपूर्वी माझ्याकडे काहीच काम नव्हते. तेव्हा मी काय करू असा प्रश्न पडला होता. काहीच मार्ग दिसत नव्हता. सगळी काम बंद झाली होती मुलांच्या फी भरायच्या होत्या.”
हेही वाचा – वडिलांच्या सेवानिवृत्तीनंतर पाठकबाईंची खास पोस्ट; म्हणाली, ‘भारतीय रेल्वेत 40 वर्ष..’
पुढे त्या म्हणाल्या, “दादरच्या स्वामी समर्थांचा मठातला फोटो माझ्या डोळ्यासमोर आला त्यावेळी मी रडत होते. दहाव्या मिनिटाला सोलापूरवरून कॉल आला की, अक्कलकोटला एक कार्यक्रम आहे. तुम्हाला यायचं आहे तुम्हाला एवढं मानधन मिळेल. हा चमत्कार घडला तिथेच मी दंडवत घातला आणि यापुढे अक्कलकोटला दरवर्षी मी येणार. तेव्हापासून स्वामींचे धरलेले पाय मी कधीच सोडणार नाही. स्वामींचे नाव माझ्या नेहमी तोंडात असते वाईट गोष्टीतून त्यांनी मला बाहेर काढलं. माझी त्यांच्यावर फार श्रद्धा आहे.”
अशाप्रकारे वाईट प्रसंगांमध्ये त्यांना स्वामींचा झालेला साक्षात्कार त्यांनी सांगितला आहे. आणि त्यानंतर तिथून पुढे आयुष्यातल्या प्रत्येक प्रसंगात त्यांना स्वामींनी साथ दिली असल्याचं त्यांनी सांगितलं.