‘..आणि मी असा प्रवास करते’; मुंबईचं ट्रॅफिक टाळायला अभिनेत्रीने लढवली ‘अशी’ शक्कल.. पहा व्हिडीओ


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मनोरंजन सृष्टीतील कलाकारांचे आयुष्य अत्यंत व्यस्त. त्यामुळे एक एक मिनिट त्यांना फार मोजून आणि सांभाळून वापरावा लागतो. दैनंदिन जीवनातील इतर गोष्टी, वैयक्तिक जबाबदाऱ्या पार पाडताना प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याची ह्यांची धडपड रोजचीचं. अनेक कलाकार मुंबई- पुणे असा रोज प्रवास करतात आणि ट्रॅफिकमध्ये कंटाळून सुद्धा शूटिंग पूर्ण करतात. शिवाय काही सेलिब्रिटी मंडळी मुंबईतच स्थायिक आहेत. पण त्यांना तरी ट्रॅफिक कुठे चुकलंय..? मग अशावेळी काही कलाकार हे ट्रॅफिक टाळण्यासाठी विविध युक्त्या लढवताना दिसतात. यांपैकी एक म्हणजे प्रिया मराठे.

मुंबईतील ट्रॅफिक टाळून शूटिंगसाठी वेळेवर पोहोचण्यासाठी अनेक कलाकार लोकलमधून प्रवास करत असल्याचे आपण अनेकदा ऐकले, वाचले वा पाहिले असेल. पण लोकलसारख्या सार्वजनिक ठिकाणी एखादा फेम फेस पाहिल्यावर चाहत्यांची गर्दी कशी टाळणार..? यासाठी अनेकदा कलाकरांना तोंड झाकून प्रवास करावा लागतो. असंच काहीस अभिनेत्री प्रिया मराठेनेही केलं आणि मस्त एसी लोकलने प्रवास केला. यासाठी प्रियाने तोंडाला स्कार्फ बांधला होता. दरम्यान तिने लोकल प्रवासाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. जो व्हायरल होतोय.

अभिनेत्री प्रिया मराठेने हा व्हिडीओ तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘लोक मला विचारतात की, तुम्ही लोकलने प्रवास करता का..? त्यांना मी सांगते हो. मी कधी कधी ट्रेनने प्रवास करते. कारण – मुंबईचं ट्रॅफिक टाळण्याचा हा एक चांगला पर्याय आहे. त्यात एसी ट्रेन म्हणजे जस्ट लाइक अ वॉव!! आणि मी असा प्रवास करते’. प्रियाची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली असून अनेक चाहत्यांनी यावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.