‘आमच्या रावणाला VFX’ची गरज नाही’; बालकलाकारासोबत तुलना करत अभिनेत्रीने उडवली सैफची खिल्ली


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ हा सिनेमा चांगलाच चर्चेत आहे. रिलीजपासून या सिनेमावर सुरु झालेलं ट्रोलिंग काही केल्या थांबायचं नाव घेताना दिसत नाहीये. हा सिनेमा चांगला हिट होईल अशी आशा होती पण सिनेमावर नुसता टीकांचा वर्षाव होतोय. या सिनेमात प्रभास, क्रिती, सैफ अली खान यांसारखे बडे कलाकार असूनही सिनेमावर टीका होतेय हे बॉलिवूड सिनेविश्वाचे दुर्भाग्य म्हणावे लागेल. या सिनेमातील पात्रांचा लूक, VFX आणि संवादांवरून प्रेक्षकांच्या संतापाचा भडका उडाला आहे. सिनेमातील दशानन रावण छपरी दाखवला आहे असे अनेकांचे म्हणणे आहे. आता ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत अरुंधतीच्या मैत्रिणीचे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्रीने देखील सैफला अप्रत्यक्ष टोला लगावलाय.

‘आदिपुरूष’ या सिनेमात अभिनेता सैफ अली खान याने रावणाचे पात्र साकारले आहे. लंकापती रावणाने बरीच दुष्कर्म केली असली तरी तो टपोरी, छपरी नव्हता असे म्हणत प्रेक्षकांनी सैफ अली खानला ट्रोल केले आहे. याचे कारण म्हणजे रावणाच्या भूमिकेसाठी सैफ अली खानचा जो लूक होता तोच मुळात कुणाला पचला नाही. यामध्ये रावणाचे कपडे, दाढी, शस्त्र, वाहन सगळ्यांवरच टीका झाली.

दरम्यान मराठी अभिनेत्री राधिका देशपांडेने तिच्या बाल नाट्यातील रावणाची भूमिका साकारणाऱ्या बालकलाकाराचं उदाहरण देत सैफ अली खानने साकारलेल्या रावणाची खिल्ली उडवली आहे. तिने सैफ अली खानने साकारलेल्या रावणाची तुलना थेट नाटकातल्या बालकलाकारासोबत केली आहे.

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

 

 

A post shared by Radhika Deshpande (@radhika_deshpande)

हि पोस्ट शेअर करताना राधिकाने एका बाजूला रावणाच्या भूमिकेतील बालकलाकाराचा फोटो आणि दुसऱ्या बाजूला सैफ अली खानने साकारलेल्या रावणाचा फोटो एकत्र शेअर केला आहे. सोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, पहिल्या फोटोत ‘रावण’ या भूमिकेत समीर गुमास्ते आणि दुसऱ्या फोटोत आदिपुरुषचा सैफ अली खान. दोघांमध्ये वयाचाच नाही तर आणखी एका गोष्टीचा फरक आहे. आमच्या समीरला रावणाच्या रूपात पाहण्यासाठी VFX ची गरज नाही. गरज आहे करोडो प्रेक्षकांची’. असं म्हणत राधिकाने शेवटी ‘सियावर रामचंद्र की जय’ हे बाल नाट्य पाहण्याचे आवाहन केले आहे.