हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेइंडस्ट्री ज्यांच्यामूळे ओळखली जाते असे अनेक कलाकार आहेत आणि यामध्ये अशोक सराफ हे नाव अत्यंत मानाने घेतलं जात. असंख्य मराठी चित्रपट, बॉलिवूड सिनेमे, नाटक आणि मालिकांमधून ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी कायम प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. कला क्षेत्रातील त्यांच्या अमूल्य योगदानासाठी नुकताच त्यांना ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ जाहीर झाला आहे. यानिमित्त सर्व स्तरांवरून त्यांच्यावर कौतुकाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होतोय. दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शेअर केलेलं खास ट्विट देखील व्हायरल होत आहे.
ज्येष्ठ मराठी चित्रपट आणि नाट्य अभिनेते अशोक सराफ यांना कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी २०२३ वर्षाचा मानाचा #महाराष्ट्रभूषण पुरस्कार देण्याची घोषणा मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी अशोक सराफ यांच्याशी बोलून त्यांचे अभिनंदनही केले.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 30, 2024
अशोक सराफ यांनी… pic.twitter.com/u7F6KkDe8z
ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना मानाचा ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ जाहीर होताच रसिक मनाचे राजकारणी अर्थात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत त्यांचे अभिनंदन केलं आहे. या ट्विटध्ये त्यांनी लिहिलं आहे कि, ‘श्री. अशोक सराफ ह्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला, त्याबद्दल अशोक सरांचे मनापासून अभिनंदन. मी मागे एकदा म्हणालो तसं, एकाच वेळेला सिनेमा, रंगभूमी आणि टीव्ही ह्या तिन्ही माध्यमांवर हुकूमत गाजवणारे चतुरस्त्र कलाकार ह्या देशाने खूप कमी पाहिले, अशोक सर त्यातले एक’.
श्री. अशोक सराफ ह्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला, त्याबद्दल अशोक सरांचे मनापासून अभिनंदन. मी मागे एकदा म्हणालो तसं, एकाच वेळेला सिनेमा, रंगभूमी आणि टीव्ही ह्या तिन्ही माध्यमांवर हुकूमत गाजवणारे चतुरस्त्र कलाकार ह्या देशाने खूप कमी पाहिले, अशोक सर त्यातले एक.
— Raj Thackeray (@RajThackeray) January 30, 2024
मराठीत… pic.twitter.com/TdC0RUwtct
पुढे लिहिलंय, ‘मराठीत कलाकारांचा अजिबात तुटवडा नाही, पण आपल्या भाषेच्या सीमा ओलांडून एखादा नट देशव्यापी ओळखला जातोय किंवा त्यासाठी प्रयत्न करतोय असं दिसत नाही. पण अशोक सर ह्या बाबतीत देखील अपवाद ठरले. महाराष्ट्र भूषण सारखे राज्यातील सर्वोच्च नागरी पुरस्कार कलाकरांना ते उमेदीत असताना मिळावेत असं मला वाटतं. अर्थात हे प्रत्येक वेळेला होतंच असं नाही पण अशोक सरांच्या बाबतीत राज्य सरकारने योग्य टप्प्यावर त्यांचा उचित सन्मान केला ह्याबद्दल राज्य सरकारचं पण मनापासून अभिनंदन. पुन्हा एकदा अशोक सराफ सरांचे मनःपूर्वक अभिनंदन !’