नादखुळा!! ढोल ताशाच्या तालावर थिरकला बॉलिवूड अभिनेता; सांगलीतील ‘तो’ व्हिडीओ व्हायरल


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड सिनेविश्वात अफलातून कॉमेडी आणि परफेक्ट टायमिंगच्या जोरावर ज्याने गेली अनेक वर्ष प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे असा विनोदी कलाकार म्हणजे राजपाल यादव. त्यांच्या कमाल विनोदी अंदाजाचे अनेक चाहते आहेत. विविध चित्रपटांमधून ते कायम विविध भूमिका आपल्या विनोदी शैलीने साकारत आले आहेत. अशा राजपाल यादव यांना महाराष्ट्रातील सांगली या शहराचा नाद लागला आहे. राजपाल यादव यांचा सांगलीतील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो ढोल ताशाच्या तालावर नाचताना दिसतोय.

त्याच काय आहे, बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव हे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. ज्याचं शूटिंग सांगलीत शिरु आहे. त्यामुळे सध्या राजपाल आणि सांगली यांची चांगली गट्टी जमली आहे. दरम्यान राजपाल यांचा सांगलीतील भन्नाट व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते ढोल – ताशांच्या गजराचा आनंद लुटत भन्नाट नाचताना दिसत आहेत. या व्हिडीओत राजपालच्या आजुबाजुला महिलांचं पथक ढोल ताशाचे वादन करताना दिसत आहे आणि अभिनेता मस्त खुल्या अंदाजात नाचत आहे.

यावेळी राजपाल यांनी सफेद कुर्ता आणि जीन्स पँट परिधान केल्याचे दिसत आहे. ढोल ताशाच्या गजर मुळातच थिरकायला भाग पाडतो. तसंच काहीस राजपाल यांच्यासोबतही झालं आहे. पूर्ण एनर्जीने ते हा गजर एन्जॉय करत आहेत. राजपालच्या या डान्सचा सांगलीकरदेखील आनंद लुटत आहेत. पुढचे अजून काही दिवस राजपाल हे सांगलीमध्ये शूट शेड्युल पूर्ण करताना दिसणार आहेत. या चित्रपटाचे नाव ‘काम चालू आहे’ असे आहे. पण यात राजपाल कोणत्या भूमिकेत दिसणार याबाबत अजून काहीही माहिती समोर आलेली नाही. पण सिनेमाचा फर्स्ट लूक व्हायरल झाला असून राजपालच्या पाठी सांगलीचा बोर्ड दिसतोय. त्यामुळे सांगली आणि राजपाल यांच्या चित्रपटाचा घनिष्ट संबंध आहे इतकं नक्की.