अस्सं पाहिजे बर्थडे गिफ्ट!! रसिका सुनीलने खरेदी केली आलिशान मर्सिडीज; Insta’वर व्हिडीओ व्हायरल


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेत्री रसिका सुनीलने ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेत साकारलेली शनाया अजूनही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. रसिकाने मालिका तसेच चित्रपटांमधून विविध भूमिका साकारत आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. रसिका ससोशल मीडियावर बरीच सक्रीय असते. त्यामुळे विविध फोटो, व्हिडीओ. आगामी प्रोजेक्ट्स आणि वैयक्तिक आयुष्यातील माहिती याच माध्यमातून चाहत्यांशी शेअर करते. आताही तिने तिच्या आयुष्यातील सर्वाधिक आनंदाची बातमी देत एक पोस्ट शेअर केली आहे. नुकतीच तिने नवीन आलिशान मर्सिडीज कार विकत घेतली आहे आणि तिची एक झलक दाखवणारा व्हिडीओ रसिकाने शेअर केला आहे.

अभिनेत्री रसिका सुनीलने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर तिच्या नव्या कोऱ्या आलिशान मर्सिडीज कारचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. लँडमार्क कार या अधिकृत इंस्टा पेजवरून रसिकाला हा व्हिडीओ टॅग करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये रसिक तिच्या कुटुंबासोबत शोरुममधून कार विकत घेताना दिसत आहे. रसिकाने तिची ड्रीम कार मर्सिडीज बेंझ खरेदी केली आहे. या व्हिडीओत अभिनेत्री शोरुमध्ये एंट्री घेताना दिसते आणि त्यानंतर तिचे कुटुंब सगळ्या फॉरमॅलिटी पूर्ण करून घेताना दिसतात. यावेळी रसिका कारची चावी घेताना अत्यंत आनंदी दिसत आहे.

या व्हिडीओत गाडी घेतल्याचा आनंद आणि प्रचंड उत्साह रसिका व तिच्या कुटुंबीयांमध्ये दिसून येतोय. शेवटी रसिका तिच्या नव्या गकोरया गाडीत स्टेअरिंग सीटवर बसताना दिसते. दरम्यान, हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यावर रसिकाचे चाहते आणि सिने इंडस्ट्रीतील तिचे मित्र- मैत्रिणी आणि अन्य नेटकरी कमेंट करून तिला शुभेच्छा देताना दिसत आहेत.