Ravindra Berde Death | अखेर कर्करोगाशी झुंज संपली, वयाच्या 78 व्या वर्षी रवींद्र बेर्डे यांनी घेतला शेवटचा श्वास


Ravindra Berde Death | मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरलेली आहे. ज्येष्ठ अभिनेते आणि दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे सखे भाऊ रवींद्र बेर्डे यांचे निधन झालेले आहे. वयाच्या 78 व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते कर्करोगाशी झुंज देत होते. अखेर हृदयविकाराच्या झटक्याने त्यांनी शेवटचा श्वास घेतला आहे.

मागील आणि दिवसापासून ते घशाच्या कर्करोगाने त्रस्त होते. त्याचप्रमाणे मुंबईतील टाटा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार देखील सुरू होते. रुग्णालयातून दोन दिवसापूर्वी त्यांना घरी आणलं. परंतु हृदयविकाराच्या झटक्याने त्यांच्या निधन झालेले आहे. त्यांच्या कुटुंबात त्यांच्या मागे पत्नी दोन मुलं, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रवींद्र बेर्डे आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केलेले आहे.

हेही वाचा- Prarthana Behere | लाल इश्क ! तळपत्या उन्हात वाळवंटात प्रार्थना बेहेरेच्या कातिल अदा

रवींद्र बेर्डे यांना 1995 मध्ये ‘व्यक्ती आणि वल्ली’ या नाटकाच्या प्रयोगादरम्यान हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर 2011 मध्ये त्यांचे कर्करोगाचे निदान झाले त्यामुळे त्या आजाराने अत्यंत त्रस्त होते l. त्यांनी मराठीत सह हिंदी चित्रपटात देखील काम केलेले आहे. 1965 साली त्यांनी अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी हमाल दे धमाल l, चंगू मंगू, थरथराट, झपाटलेला, भुताची शाळा, गंमत जंमत, एक गाडी बाकी आनाडी, खतरनाक अशा अनेक चित्रपटात काम करून त्यांच्या अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनावर सोडलेली आहे.

त्यांच्या निधनाने त्यांच्या चाहत्यांमध्ये दुःखाचे वातावरण पसरलेले आहे. अनेक चाहते तसेच कलाकार देखील सोशल मीडियावर पोस्ट करून दुःख व्यक्त करत आहेत.