‘लग्नाची तारीख काय आहे?’ रिंकू – आकाशच्या फोटोवर चाहत्याची कमेंट चर्चेत


मराठी चित्रपटसृष्टीमध्ये असे अनेक कलाकार आहे ज्यांचे असंख्य चाहते आहेत. त्यात रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर ही ऑन स्क्रीन जोडी सगळ्यांना खूपच जास्त आवडते. काही वर्षांपूर्वी या दोघांनी सैराट नावाचा चित्रपट एकत्र केला होता. त्यानंतर दोघाना प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यांच्या चाहत्यांना त्यांना एकत्र पाहायला खूप आवडते. आता पुन्हा एकदा त्यांना एकत्र कधी पाहायला मिळतील याची सगळेजण वाट पाहत आहे.

रिंकू आणि आकाश हे दोघेही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. त्यांचे विविध फोटो व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहोचवत असतात. अशातच त्यांनी बॉलिवूड अभिनेता आमिर खानच्या मुलीच्या रिसेप्शनला हजेरी लावली होती. त्या वेळचे त्यांचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झालेले आहेत.

या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की रिंकूने निळ्या रंगाची साडी नेसली आहे. आणि मराठमोळा पेहराव केलेला आह. तर आकाशने देखील ब्लॅक कलरचा कोट घातलेला आहे.

त्या दोघांनी देखील त्यांच्या सोशल मीडियावर काही एकत्र फोटो पोस्ट केले आहेत. अनेक दिवसांनंतर आकाश आणि रिंकूला एकत्र पाहून त्यांच्या चाहत्यांना खूप आनंद झालेला आहे. आणि अनेकजण त्यांच्या या फोटोवर कमेंट करत आहेत.

त्यांच्या एका चाहताने कमेंट केली आहे की, “तारीख काय ठरली मग लग्नाची? कधी येऊ मी.” तर दुसऱ्याने “सैराट टूची शूटिंग चालू झाली आहे” अशी कमेंट केली आहे. त्याचप्रमाणे आणखी एकाने म्हटले आहे की, “साधं लग्न करू नका पळून लव मॅरेज करा.”अशा अनेक प्रकारे त्यांचे राहते त्यांच्या या फोटोवर कमेंट करत आहे आणि प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

त्याचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहेत. सध्या आकाश आणि रिंकू हे दोघेही आपापल्या आगामी प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहेत. रिंकू ही सध्या ‘झिम्मा 2’या चित्रपटात दिसली आहे. आकाश हा लवकरच त्याचा एक नवीन सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.