Rinku Rajguru | रिंकू राजगुरूने केले निर्मिती सावंत यांच्यासोबत फोटो शेअर; म्हणाली, ‘सासू असावी तर अशी…’


Rinku Rajguru | सध्या झिम्मा 2 हा चित्रपट यशाचे शिखर गाठत आहे. हा चित्रपट सगळ्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे झिम्मा 2 मध्ये शिवानी सुर्वे आणि रिंकू राजगुरु या दोन अभिनेत्री नव्याने आल्या. या दोघींना देखील संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात प्रेम मिळत आहे. रिंकू हिने सैराट या चित्रपटातून मराठी चित्रपट सृष्टीमध्ये पदार्पण केले. अगदी लहान वयात तिने अभिनयाला सुरुवात केली. ती सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते आणि तिच्या अपडेटबद्दल तिच्या प्रेक्षकांना ती माहिती देत असते.

अशीच एक पोस्ट सध्या रिंकूने सोशल मीडियावर केली आहे. आणि त्याने चांगली चर्चा रंगली आहे. अभिनेत्री निर्मिती सावंत यांच्याबरोबरचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. या फोटोला दिलेल्या आहे. हा फोटो शेअर करून तिने लिहिले आहे की, “माझं लग्न झालेलं नाही पण सासू पाहिजेल तर अशी.” असं रिंकू ने म्हटलं आहे. आणि या पोस्टवर तिला अनेक कमेंट देखील आलेला आहे.

हेही वाचा- अर्जुनमुळे मधुभाऊंना न्याय मिळणार; खऱ्या आरोपीचा चेहरा समोर येणार..? नवा प्रोमो व्हायरल

झिम्मा 2 या चित्रपटात निर्मिती सावंत आणि रिंकू राजगुरू या दोघी एकमेकींच्या सासू सुनेच्या भूमिकेत दाखवलेले आहेत. त्या दोघींची कॉमेडी देखील सगळ्यांना खूप आवडले. आणि त्यांचे नाते देखील सगळ्यांना खूपच आवडलेले आहे