Rinku Rajguru |रिंकू राजगुरूने सांगितला ‘झिम्मा 2’ चा अनुभव; म्हणाली, ‘102 डिग्री ताप असताना मी…’

Rinku Rajguru | सध्या ‘झिम्मा 2’हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालताना दिसत आहे. हेमंत होमे यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर जादू करत आहे. 2021 मध्ये रिलीज झाला होता. या सिनेमाला देखील प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले होते आता देखील झिम्मा 2 ला प्रेक्षकांचा अफाट प्रतिसाद मिळत आहे. आता या चित्रपटात रिंकू राजगुरु हिचा देखील समावेश झालेला आहे. झी मराठी या चित्रपटात रिंकू ही निर्मिती सावंत यांच्या सुनेची भूमिका साकारताना दिसत आहे.

झिम्मा 2 मधील रिंकूचे काम पाहून तिचे सर्वत्र कौतुक होत आहेत. या सिनेमात तिने एक अंडरवॉटर सीन देखील शूट केला आहे. मात्र रिंकूने दिलेल्या मुलाखतीत तिच्या या चित्रपटातील अनुभव सांगितला आहे. तिने अंडरवॉटर शूट केलं होतं. त्याबद्दलही सांगितले तिने सांगितले की हा शूट करताना तिला 102 डिग्री ताप होता.

यावेळी रिंकू म्हणाली की, “या चित्रपटात माझा आणि सायलीचा एक सीन आहे. तो मला खूप आवडला ट्रेलरमध्ये तुम्ही पाहिला असेल की, मी तलावात उडी मारताना दिसत आहे. तो सीन आम्हाला वन टेक हवा होता. सहा डिग्री सेल्सिअस तापमान होते. सगळे कुडकुडत बसले होते आणि त्यांनी मला तुला जाऊन फक्त उडी मारायची आज3 असे सांगितले.”

पुढे ती म्हणाली की, ‘मला खूपच दडपण होतं पण मी फक्त परत गेले. उडी मारली आणि पोहायला लागले. ते पाणी इतका थंड होते की, मी सांगू शकत नाही पण वनटेकमध्ये तो सीन झाला. या चित्रपटात मी पहिल्यांदाच अंडर फोटोशूट केला आहे. ते कसं करताना मला माहित नव्हतं त्यात मला 102 डिग्री ताप होता मला कणकण होती. पण वेळ नसल्यामुळे कणकण असूनही मला तो सीन करावा लागला आमच्या टीमने माझी पूर्णपणे काळजी घेतली पण आता बघताना ते छान वाटतंय आपण केलेल्या कष्टाचा फळ मिळाल्यासारखे वाटते.”

सध्या झिम्मा 2 हा चित्रपट प्रदर्शित होऊन दोनच दिवस झाले आहे. तरी देखील या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर चांगला धुमाकूळ घातलेला आहे. या चित्रपटात रिंकू राजगुरु, निर्मिती सावंत, क्षिति जोग, सुहास जोशी, सायली संजीव, सचित्र बांदेकर, शिवानी सुर्वे, सिद्धार्थ चांदेकर हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर 1.20 कोटीचा गल्ला जमवला आहे.

सध्या ‘झिम्मा 2’हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालताना दिसत आहे. हेमंत होमे यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर जादू करत आहे. 2021 मध्ये रिलीज झाला होता. या सिनेमाला देखील प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले होते आता देखील झिम्मा 2 ला प्रेक्षकांचा अफाट प्रतिसाद मिळत आहे. आता या चित्रपटात रिंकू राजगुरु हिचा देखील समावेश झालेला आहे. झी मराठी या चित्रपटात रिंकू ही निर्मिती सावंत यांच्या सुनेची भूमिका साकारताना दिसत आहे.

हेही वाचा- हेमांगी कवी साकारतेय हिंदी मालिकेत मराठमोळी भूमिका; म्हणाली, ‘हे पात्र साकारताना..’