‘हासताच चांदणी.. लाजताच मोहिनी.. पाहताच कामिनी..’; रिंकूला पाहून चाहत्यांचं मन झालं गुलाबी


हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेत्री रिंकू राजगुरू हि नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ या चित्रपटातून प्रकाशझोतात आली. तिने साकारलेली आर्ची प्रेक्षकांच्या काळजात घर करून बसली आहे. लहान वयात रिंकूने तिच्या अभिनयाच्या जोरावर सिनेविश्वात केवळ पदार्पण केले नाही तर आपला डंका गाजवला. यानंतर तिने अनेक चित्रपटांमध्ये, वेबसिरीजमध्ये काम केलं. तेव्हापासून रिंकूचा चाहता वर्ग रोज वाढताना दिसतो आहे. शिवाय ती सोशल मीडियावर सक्रिय असल्यामुळे विविध पोस्ट शेअर करून सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसते.

https://www.instagram.com/reel/CvWmO6_tlKq/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==

अभिनेत्री रिंकू राजगुरू हि सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे. ती नेहमीच सोशल मिडीयावर विविध लूकमधील फोटो तसेच व्हिडीओ शेअर करत असते. आपल्या मनमोहक अंदाजाने आणि सौंदर्याने ती सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरते. तिचे कित्येक लूक सोशल मीडियावर व्हायरल देखील झाले आहेत. अशातच आता तिने आणखी एक सिम्पल लूक शेअर केला आहे. एका व्हिडीओ पोस्टच्या माध्यमातून तिने BTS व्हिडिओंसह काही फोटोदेखील शेअर केले आहेत.

या व्हिडिओत रिंकूने गुलाबी फ्लोरल प्रिंट असलेला अनारकली ड्रेस परिधान केल्याचे दिसत आहे. मोकळे केस, लाईट मेकअप, कानात झुमके अशा अत्यंत साध्या पण मनमोहक अंदाजाने रिंकूने सर्वांचे मन जिंकून घेतले आहे. तिच्या या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी विविध कमेंट केल्या आहेत. एकाने म्हटले आहे कि, ‘स्वतः च्या मर्यादा राखून तू स्वतः ला सोशल मीडियावर प्रेझेन्ट करतेस रिंकू.. तुझा खूप अभिमान वाटतो’. तर आणखी एकाने म्हटले आहे कि, ‘साऊथ इंडियन वाटतेयस’. तर आणखी एकाने म्हटले, ‘या पेहरावात तू किती साधी आणि किती गोड वाटते आहेस.. खूप सुंदर’.