Rinku Rajguru | ‘तुमच्या बॉयफ़्रेंडचे नाव काय?’ चाहत्यांच्या प्रश्नावरील रिंकूचे उत्तर सोशल मीडियावर व्हायरल


Rinku Rajguru | सैराट चित्रपटातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरू. तिने अगदी कमी वेळात तिची एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. या चित्रपटातून तिला आर्ची या नावाने चांगलीच ओळख मिळाली. त्यानंतर तिने अनेक चित्रपटात काम करून तिची एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. रिंकू ही चित्रपटांशिवाय सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.

रिंकू सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिच्या आयुष्याबद्दल अनेक माहिती ती सोशल मीडियावर देत असते. अशातच तिने सोशल मीडियावर आस्क मी क्वेश्चन हे सेशन घेतले. त्यावेळी तिच्या चाहत्यांनी तिला तिला अनेक प्रश्न विचारले. आणि तिने उत्तर देखील दिले अशातच एका चाहताने तिला “तुमच्या बॉयफ्रेंडचे नाव काय आहे?” असा प्रश्न विचारतात यावर रिंकूने दिलेले उत्तर सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.

चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देत रिंकू उत्तर दिले की, “बॉयफ्रेंड नाही तर नाव पण नाही.” आणि तिने एक हसण्याची देखील पोस्ट केली आहे रिंकूने दिलेल्या या उत्तराची चांगली चर्चा रंगली आहे. त्यामुळे रिंकू अजूनही सिंगल असल्याचे तिने या पोस्टमधून सांगितले आहे.

हेही वाचा – ‘प्रेम म्हणजे प्रेम असतं’ची कॉन्सेप्ट बदलणार ‘श्रीदेवी प्रसन्न’; नव्या चित्रपटाचा धमाल टीझर प्रदर्शित

रिंकू नुकतेच ‘झिम्मा 2’ या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटातील तिचे तान्या आहे पात्र चांगलेच गाजले आणि प्रेक्षकांना तिचे हे पात्र खूप आवडले आहे.